देशाच्या प्रधानमंत्र्यांना उघडपणे कोणी मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करू शकते का?

'मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो' या नाना पटोले यांच्या वायरल झालेल्या वक्तव्यावरून भाजपा नेते आक्रमक, पटोले यांना अटक करण्याची केली मागणी 
नागपूर : काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे मोदींना मारू शकतो शिव्या देऊशकतो असं म्हणणारा विडिओ वायरल झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. यावर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी नागपूर आणि नाशिक येथे नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार देखील करण्यात आली आहे. दरम्यान भाजपाचे नेते नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी नाना पटोले यांची फक्त उंची वाढली आहे बुद्धी नाही वाढली अशी टीका केली आहे.नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून राज्यातील भाजपा नेते चांगले संतापले अहेत. नाना पटोलेवर गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी करत अहेत .

वायरल झालेल्या व्हिडिओचे वास्तव काय
नाना पटोले हे निवडणूक प्रचार करत असताना गावातील लोक त्यांच्या भवती गराडा घालून उभे अहेत आणि गावातील एका गुंडाविषयी तक्रार करत अहेत. गावातील या गावागुंडाच टोपण नाव देखील मोदी आहे.तेव्हा लोकांच्या तक्रारी ऐकून नाना पटोले मोदी नावाच्या गावगुंडाला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं बोलत असतानाचा विडिओ वायरल झाला आहे. परंतु मोदींना मारण्याच्या आणि शिव्या देण्याच्या वायरल झालेल्या व्हिडिओ मुळे राज्यातील भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले अहेत. यावरून नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की मी देशाचे प्रधानमंत्री मोदी यांच्या विषयी बोललो नसून मोदी नावाच्या एका गावगुंडाबद्दल बोललो आहे.

नाना पटोले यांनी खरोखरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी असं वक्तव्य केलं असेल तर ही बाब गंभीर आहे.परंतु नाना पटोले यांनी या वक्तव्याचा खुलासा केला आहे की देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बोललो नसून गावातील टोपण नाव मोदी असलेल्या गुंडाबद्दल बोललो आहे.परंतु देशाच्या प्रधानमंत्र्याविषयी पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा डोळस पणे विचार केला तर देशाच्या प्रधानमंत्र्यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा अशा प्रकारे उघडपणे कोणी बोलू शकणार नाही एवढं मात्र नक्की.
Previous
Next Post »