लखनऊ : (UP: Election) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय नेते मंडळी आपापल्या सोयीनुसार पक्षांतर करत अहेत.परंतु सर्वात जास्त आऊट गोइंग ही(BJP)भाजपातून होत असून (SP)समाजवादी पक्षात इनकमिंग वाढली आहे. भाजपा, बसपा आणि इतर लहान सहान पक्षातील नेते समाजवादी पक्षात दाखल होत अहेत.परंतु सत्ताधारी भाजपा सरकार मधील आमदार व मंत्री सपा मध्ये दाखल होत असल्यामुळे भाजपात मात्र खळबळ उडाली आहे.
सपा मध्ये इतर पक्षातील नेते, आमदार आणि मंत्री दाखल होत असल्यामुळे अखिलेश यादव यांची बाजू मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे युपी मध्ये विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर पहायला मिळणार असून सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत मिळत अहेत. सबका साथ सबका विकास म्हणून 2017 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपाने केवल विशिष्ट लोकांचा विकास केला असून दलित ओबीसी समाजाला विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप योगी सरकार मधील आमदार आणि मंत्र्यांनी केला आहे.
स्वार्थासाठी राजकीय नेत्यांचे पक्षांतर :
नेत्यांची दलबदली हा केवल त्यांचा स्वार्थ आहे. अशा नेत्यांकडे कुठलीच विचार धारा नसते किंवा तत्व आणि निष्ठा नसते. हे सर्व संधी साधू असून कुठल्याही राजकीय पक्षात जाऊन सत्ता मिळवणे हा त्यांचा एकमेव स्वार्थ असतो. असे संधी साधू नेते समाजहितासाठी काम करत नसून समाजाच्या नावाने स्वतःचा स्वार्थ साधत असतात. स्वतःला धर्मनिरपेक्ष किंवा समाजवादी असल्याची दवंडी वाजणारे नेते स्वार्थासाठी भाजपात दाखल होतात. त्यामुळे अशा नेत्याकडून समाजहिताची अपेक्षा करणे चुकीचे आहे. परंतु उत्तर प्रदेशात सध्या होत असलेल्या पक्षांतराच्या घडामोडी मुळे समाजवादी पक्षाची ताकद मात्र नक्की वाढणार आहे हे मात्र स्पष्ट आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon