ऍट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याकडे देणे योग्य आहे काय?

ऍट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणे म्हणजे एससी एसटी समाजावर अन्याय करणारा निर्णय 
मुंबई : राज्याच्या गृहविभागाकडून नुकताच एक आदेश जारी करून ऍट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. या पूर्वी अशा गुन्ह्यांचा तपास हा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा दर्जा असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे  होता. ऍट्रॉसिटी सारख्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याकडे तपास करण्याचा अधिकार होता. परंतु आता गृहविभागाने पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ऍट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास देण्याच्या सूचना पोलीस खात्याला देण्यात आल्या अहेत.

ऍट्रॉसिटी सारख्या गंभीर आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून काढून घेऊन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणे कितपत योग्य आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी संरक्षक म्हणून ऍट्रॉसिटी ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे.परंतु सरकार आता ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपिंना अभय देण्यासाठी ह्या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देत आहे काय.

स्थानिक पातळीवरील पोलीस अधिकारी हे सत्ताधारी किंवा स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावाखाली ऍट्रॉसिटी सारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यांचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक करू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यात पीडितांना योग्य न्याय मिळणार नाही. गृहविभागाने अशा प्रकारचा निर्णय घेऊन एक प्रकारे अनुसूचित जाती जमातीतील अन्याय ग्रसतांना न्याय न मिळू देण्याची व्यस्था केली आहे काय? असा देखील प्रश्न निर्माण होतोय.गृहविभागाने घेतलेला निर्णय अनुसूचित जाती जमातीवर अन्याय करणारा आहे . त्यामुळे गृहविभागाने ऍट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे न देता पूर्वीसारखाच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावा.
Previous
Next Post »