Kanshiramji :बहुजन नेता कांशीरामजी यांचा 16 वा महापरिनिर्वाण दिवस

देशाच्या राजकारणात बहुजन राजकारणाचा ठसा उमटीवणारे कांशीरामजी यांचा 16 वा महापरिनिर्वाण दिवस.
भारतीय राजकारणात शोषित,पीडित समाजाला खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणुन बहुजन राजकारण प्रस्थापित करून दलित, शोषित, पीडित मागासवर्गीय समाजाला निळ्या झेंड्याखाली एकत्र आणुन उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्यात सत्ता स्थापन केली.

"होऊ शकत है" चा विश्वास बहुजन समाजात निर्माण करून काश्मीर ते कन्याकुमारी संबंध भारत जयभिम चा नारा देऊन फुले शाहू आंबेडकर विचारधारा समाजात रुजविली. शासन कर्ती जमात बनण्याचे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न कांशीराम जी यांनी उत्तर प्रदेशात पूर्ण करून दाखविले.

बहुजन विचारधारा मानणारे सामाजिक आणि राजकीय पक्ष कांशीरामजी यांचा स्मृतिदिन साजरा करतात.9 ऑक्टोबर 2006 रोजी या महान बहुजन नेत्याचे परिनिर्वाण झाले आज त्यांचा 16 वा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्यानिमित्ताने आज त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Previous
Next Post »