पोलीस जनतेचे रक्षक की धर्माचे रक्षक? पोलीस धार्मिक आंदोललात सहभागी, अशा पोलिसाकडून इतर समाजाला न्याय मिळेल का?

                            (संग्रहित चित्र )
त्रिपुरातील धार्मिक आंदोलनात पोलीसांचा सहभाग,देश व राज्यासाठी गंभीर आणि चिंतेची बाब
सध्या एक विडिओ वायरल होतोय ज्यामध्ये पोलीस कर्मचारी एका धार्मिक आंदोलनात सहभागी झालेले दिसून येत असून ते हिंदू धर्म रक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. त्यामध्ये पोलीस कर्मचारी जय श्रीरामच्या नावाने घोषणा देताना दिसत आहेत. सदरील विडिओ त्रिपुरातील असल्याचे समजते. नेमका प्रकार काय आहे हे मात्र समजू शकलं नाही. परंतु अशा प्रकारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे धार्मिक आंदोलनात सहभागी होत असतील तर ही बाब देशाच्या हितासाठी अतिशय घातक आणि चिंतेची आहे.

आपल्या देशात संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे प्रत्यकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचा, पूजाआर्च्या करण्याचा आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.परंतु सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना कर्तव्यावर असताना धार्मिक आंदोलनात सहभागी होता येते का? त्यातल्यात्यात पोलिसांना कर्तव्यावर असताना धार्मिक आंदोलनात सहभाग घेता येतो का? पोलीस हे जनतेचे रक्षक असतात पोलिसांचा धर्म जनतेचं रक्षण करणे आहे.जर पोलीस धार्मिक आंदोलनास उधडपणे पाठींबा देत असतील, आंदोलनात सहभागी होत असतील तर इतर धर्मातील लोकांना अशा पोलिसापासून न्याय मिळूच शकत नाही.

अशा पोलिसाकडून धार्मिक अत्याचारला खतपाणी दिलं जाईल ही बाब देशासाठी अत्यन्त घातक आणि चिंता वाढवणारी आहे. वायरल होत असलेल्या विडिओ मध्ये जे पोलीस कर्मचारी जय श्रीरामच्या घोषणा देताना दिसत आहेत ते कुठले आहेत आणि त्यांच्यावर सरकार काय कार्यवाही करणार हे बघावे लागले. परंतु ही घटना सत्य असेल तर मात्र नक्कीच देशासाठी घातक बाब आहे.




Previous
Next Post »