मुंबई : राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेच्यावतीने काल शनिवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज ठाकरे बोलताना म्हणले की मस्जितीवरील भोंगे उतरायला पाहिजे अन्यथा आम्ही मस्जितीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाचन करू अशा प्रकारचा ईशारा दिला आहे.दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मस्जितीवरील भोंगे उतरविण्याचे म्हटले होते. त्याची पुनरावृत्ती राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना लक्ष केलं. राज्यात जातीचे राजकारण शरद पवारांनी सुरु केलं असा आरोप देखील राज ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलताना केला. शिवसेनेवर देखील त्यांनी सडकून टिका केली. भाजपासोबतची युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केल्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नसल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणात राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांवर रोष होता.विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपा बद्दल चक्कार शब्दही काढला नाही. याचाच अर्थ असा की येणाऱ्या काळात राज्यात मनसे हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हिंदुत्ववादी भाजपासोबत राज ठाकरे मनसेची गाठ बांधण्याची शक्य आहे.
मस्जितीवरील भोंगे उतरविण्याची राज ठाकरे यांची मागणी योग्य आहे का?
राजकारणात राजकीय पक्षांवर आरोप-प्रत्यारोप, टीका- टिप्पणी होतच असते यात नवीन असं काही नाही.परंतु आपला पक्ष कट्टर हिंदुत्ववादी आहे हे दाखण्यासाठी मस्जितीवरील भोंगे उतरविण्यास सांगणे हे कितपत योग्य आहे.मस्जितीवर लावलेल्या भोंग्यामुळे आजान देताना आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो अस राज ठाकरे यांचं म्हणणे आहे.
मस्जितीवर लावलेल्या भोंग्यामुळे लोकांना त्रास होत असेल तर अनेक हिंदू मंदिरात पहाटे 4 वाजल्या पासून पूजा अर्चा करताना घंटा वाजवली जाते. पहाटे काकड आरती असते. रात्री उशीरा पर्यंत मंदिरात भजन कीर्तन चालू असते. सात सात दिवसांचे प्रवचन सप्ताह आयोजित केले जातात. यामध्ये देखील सर्रास पणे लाऊडस्पीकर (भोंगे ) वापरले जाते. यामुळे इतर धर्मीय लोकांना त्रास होत नाही का? मस्जितीवरील भोंग्यामुळे जर लोकांना त्रास होत असेल तर हिंदू मंदिरावरील भोंगे उतरविण्यास देखील राज ठाकरे यांनी सांगायला पाहिजे.
राज ठाकरे हे राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू- मुस्लिम या दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत .
संपादकीय...
ConversionConversion EmoticonEmoticon