शेतकरी एकजुटीचा विजय,प्रधानमंत्री मोदी शेतकऱ्यांसमोर नमले
तीन केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात मागील वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रधानमंत्री मोदींनी हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे.हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून केंद्रातील भाजपा सरकार देशातील शेतकऱ्या समोर नमले आहे. पुढील वर्षीच्या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मोदी सरकारने निर्णय घेतला आहे.
आज गुरुनानक जयंती आहे. पंजाब आणि हरियाणा मधील शेकरी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरिधात मागील एक वर्षांपासून आंदोलन करत आहेत.आज पर्यंत 700 हून अधिक शेतकरी या आंदोलनात मृत्यू मुखी पडले आहेत. तरीही आंदोलन सुरूच आहे. प्रधानमंत्री मोदींनी तीन कृषी कायदे वापस घेत असल्याची घोषणा केली आहे. परंतु शेतकरी संघटना आंदोलन वापस घेण्यास तयार नाहीत.जोपर्यंत सरकार संसदेत हे बील रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे .
ConversionConversion EmoticonEmoticon