राज्यात 1 जानेवारी रोजी 9 हजार 170 आढळले नविन कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण ; एकट्या मुंबईत 6 हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

                      प्रतिनिधिक चित्र 
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना ओमायक्रोनची संख्या देखील वाढत आहे 
मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत असून ओमायक्रोन रुग्णांची सुद्धा संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यासाठी ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे.त्याच पार्शवभूमीवर राज्य सरकार ऍक्शन मोड मध्ये असून राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी राज्यात 9 हजार 170 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईत 6 हजार 347 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले अहेत. दिवस भरात राज्यात 7 कोरोना बाधित रुग्णांचा तर मुंबईत एका रुग्णचा मृत्यू झाला आहे.राज्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर 2.11 टक्के एवढा आहे.
या शिवाय आज राज्यात 1हजार 445 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आतापर्यंत राज्यात 65,10,541कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले अहेत. राज्यात रुग्ण होण्याचे प्रमाण (recovery rate) 97.35 इतके आहे.
आज रोजी राज्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 32,225 एवढी आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित एकूण रुग्णांची संख्या आता 66,87,991एवढी झाली आहे. तर आजपर्यंत राज्यात 1,41,533 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.तसेच राज्यामध्ये आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 69136643 प्रयोग शाळेतील नमुन्यापैकी 66,87,991(9.67 टक्के )नमुने पॉजिटीव्ह आलेले अहेत.तसेच राज्यात आता 2,26,001एवढे व्यक्ती गृह विलीगीकरणात अहेत तर 1,064 व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात अहेत.
Previous
Next Post »