परभणीतील प्रस्तावीत मेडिकल कॉलेजसाठी समिती दौऱ्यावर

                 ( प्रतिनिधिक चित्र )
परभणी येथे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंतर राष्ट्रीय वित्तीय समिती दौऱ्यावर 
परभणी : परभणी येथे प्रास्ताविक असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधाने अंतर राष्ट्रीय वित्तीय संस्थेची समिती 17 नोव्हेंबर रोजी परभणी दौऱ्यावर येत आहे.परभणीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष चालू होता.सामाजिक राजकीय पातळीवरून मोर्चे आंदोलनाच्या मध्येमातून यासाठी प्रयत्न केला गेला होता. अखेर परभणीकरांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. त्यानुसंगाने अंतर राष्ट्रीय वित्तीय संस्थेची एक समिती 17 नोव्हेंबर रोजी परभणी दौऱ्यावर येत असल्याची माहिती आहे.

ही समिती जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर ठिकाणी भेटी देणार आहे.शिवाय जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांची देखील ही समिती भेट घेणार असल्याचे कळते.
Previous
Next Post »