राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षाकरिता (1) राज्य शासनाने राज्याच्या आगामी बजेट मध्ये 100 कोटींची तरतूद करावी, (2)कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू मिलचे पुनर्जीवन करून कोल्हापूरच्या विकासाठी रोजगाराचे दालन उघडावे,(3) कोल्हापूर किंवा राज्यात कुठेही दिल्ली येथील एम्सच्या धर्तीवर किंवा जागतिक दर्जाचे सुपर स्पेसिऍलिटी हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थना करावी, (4) शैक्षणिक क्षेत्रात कोल्हापूर किंवा राज्यात कुठेही राज्यसरकारने जागतिक दर्जाचे आयटीआय किंवा आयआयएम सारख्या उच्चदर्जाच्या संस्थेची निर्मिती करावी,(5) राज्यातील सर्व अल्प भूधारकांना 5000 रुपये मासिक पेन्शन योजना सुरु करावी ( 6) राज्यातील प्रत्येक तालुका स्तरावर एससी एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व सुसज्ज हॉस्टेलची निर्मिती करावी,(7) राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात नौकर भारतीतील आरक्षण,पदोन्नतीतील आरक्षण,मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण व ओबीसीचे राजकीय आरक्षण सुरक्षित करण्यासाठी तात्काळ योग्य असा निर्णय घ्यावा आदी मागण्यासंदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे,अब्दुल अजीज अज्जू भाई जेष्ठ नेते,शेख अजीम भाई वणीकर (जिल्हा उपाध्यक्ष ),सय्यद नुसरत (जिल्हा कोषाध्यक्ष ),शेख नईम (शहर उपाध्यक्ष ),यास्मिन शेख (जिल्हा सचिव ) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon