नवी दिल्ली : लडाखच्या गलवान मध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चिनी सैनिकांनी आपला झेंडा फडकावून गलवान हा चिनचा भाग असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.याबाबतचे फोटो आणि विडिओ चीन सरकारने आपल्या अधिकृत वृत्त वाहिनीवर प्रसारित केले अहेत. या प्रकारा नंतर काँग्रेस खाजदार राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या 56 इंची छातीच्या दाव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे.प्रधानमंत्र्यांनी याबाबत बोललं पाहिजे आणि चीनला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे असही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
चीनचा सरकारी मीडिया असलेल्या ग्लोबल टाईम्सने 1 जानेवारी रोजी आपल्या सैनिकांचा विडिओ ट्विट केला आहे.त्यामध्ये त्या व्हिडिओला दिलेल्या कॅपशन मध्ये लिहिलं आहे की,भारतीय सिमेजवळ गलवान मध्ये चीन चे नागरिक नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत अहेत.तसेच या व्हिडिओ मध्ये चिनी सैनिक ज्याठिकाणी उभे अहेत, त्यांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर चिनी भाषेत लिहिलं आहे की,आम्ही एका इंचही जमीन देणार नाहीत. तसेच या भागात चीनी सैनिकांनी चीनचा झेंडा फडकवलेला दिसत आहे.परंतु याबाबतीत भारताने अजून पर्यंत कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही तसेच चीनला कोणतेच प्रति उत्तर दिले नाही.
याबाबत रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की मोदीजी तुमचं तोंड उघडा! चीन का सडेतोड उत्तर द्यावं लागेल.गलवान मध्ये आपला तिरंगाच चांगला दिसतो असं देखील ट्विट मध्ये म्हटलं आहे. या आधी सुद्धा राहुल गांधी यांनी चीनच्या अशा कुरापती वागण्यावरून चीनला उत्तर न दिल्यामुळे मोदींवर निशाणा साधला आहे.या आधी देखील 20 मे 2020 रोजी पॅगँग लेक भागात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. नंतर 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत हिंसक झाटापट झाली होती. त्यामध्ये 20 भारतीय सैनिक शाहिद झाले होते.परंतु प्रधानमंत्री मोदी रविवारी चीन ने केलेल्या कुरापतीवर काय भूमिका घेतात ते मात्र बघावे लागेल.
ConversionConversion EmoticonEmoticon