परभणी महापालिकेच्या वार्ड रचनेचे काम वेगाने सुरु असून 25 प्रभागातून 76 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
परभणी :परभणी महानगर पालिकेची निवडणुक पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे.वार्ड संख्या वाढविण्यात आली आहे.25 प्रभाग निश्चित करण्यात आले असून 76 वार्ड बनवण्यात येत आहेत.76 पैकी 38 जागा या महिलासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.त्यानुसार वार्ड रचनेचे काम वेगाने सुरु आहे.
परभणी महानगर पालिकेची मुद्दत मे महिन्याच्या 25 तारखेला संपत आहे. निवडणुक एप्रिल महिन्यात होणार असून ती वेळेत पारपडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नगर रचना विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वार्ड रचना केली जात आहे.2011 च्या जनगनने अनुसार लोक संख्या वाढली असल्यामुळे व शहरातील वाढती लोक संख्या लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत 65 वरून 76 वाढवण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचे धोरणं राज्य सरकारने ठरवले आहे. त्यामुळे परभणी महानगर पालिकेत 76 पैकी 38 जागा महिलासाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.त्यानुसार कच्चे आराखडे तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मनपा आयुक्त यांना देण्यात आले आहेत.आराखडे तयार करून 25 डिसेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे स्थानिक नगरविकास रचना विभाग कामाला लागला आहे.बहूसदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे निवडणूक घेण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे त्यामुळे तीन सदस्यांचा एक प्रभाग असेल. या पद्धतीने 24 प्रभाग तीन सदस्यांचे असतील तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon