परभणी जिल्ह्यात 62 शाळांची स्मार्ट क्लास साठी निवड

                      (प्रतिनिधिक चित्र )
जिल्ह्यातील अल्पसंख्यांक भागातील 62 शाळांची स्मार्ट क्लास साठी निवड, तीन कोटी रुपये निधी मंजूर
परभणी :परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बाहुलं भागातील 62 शाळांची स्मार्ट क्लास साठी निवड करण्यात आली आहे.केंद्र सरकारची ही योजना असून 62 शाळेतील 124 वर्गासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पसाठी 3 कोटी 14 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत ही योजना राबली जाणार आहे.केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत या प्रकल्पला या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी मान्यता देण्यात आली होती.या योजने अंतर्गत अल्पसंख्यांक बहुल भागातील 62 शाळेतील 124 वर्गामध्ये स्मार्ट क्लास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या साठी केंद्र सरकारकडून 60 टक्के तर राज्य सरकारकडून 40 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्मार्ट क्लास प्रकल्प अंतर्गत लागणारे साहित्य संबंधित शाळांना टीसीआयएन या कंपनीकडून पुरविले जाणार आहे.तसेच या प्रकल्प अंतर्गत तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी 50 शाळासाठी एका टेकनिकलची नेमणूक करण्यात येणार आहे.परभणी जिल्ह्यातील 62 शाळामधील 124 वर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट क्लास प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून एक कोटी 88 लाख रुपये तर राज्य शासनाकडून एक कोटी 25 लाख रुपये निधी देणार आहे.हा प्रकल्प राबविण्यासाठी पहिला टप्पा म्हणून केंद्र सरकारकडून 56 लाख रुपये तर राज्य शासनाकडून 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Previous
Next Post »