शॉट सर्किटने आग लागून परभणी, गंगाखेड आणि पाथरी तालुक्यात एकाच दिवशी ऊस जळाला
परभणी :परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात खळी, पाथरी तालुक्यातील पोहे टाकली आणि परभणी तील असोला या तीन ठिकाणी एकाच दिवशी 15 नोव्हेंबर रोजी शॉट सर्किटमुळे आग लागून ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खळी येथील शेतकरी विठ्ठल शेषराव पवार याच्या सर्व्हे नं 380 मध्ये असलेल्या शेतात विद्युत तारा एकमेकांना घासल्याने शॉट सर्किट होऊन आग लागून तीन एकर ऊस जळून खाक झाल आहे.
शॉट सर्किट मुळे आग लागल्याचे कळताच शेतात काम करत असलेल्या शेख रफिक सदानंद पवार यांनी आरडाओरड केल्याने बाळासाहेब पवार उत्तम पवार यांनी लाईन मन सुरवसे आणि लंगोटे यांना बोलावून विद्युत पुरवठा बंद केला. या सर्वांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती शेवटी गंगाखेड येथून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.अग्निशमन दलाचे कर्मचारी रामविलास खंडेलवाल, राज साळवे,शाम जगतकर सुरज खंडेलवाल पंकज गायकवाड तसेच ग्रामस्थानी प्रयत्न करून सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आणली.घटना स्थळाची तलाठी अनिल खळीकर यांनी पाहाणी केली.या आगीत तीन एकर पेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला आहे.
परभणी तालुक्यातील असोला शिवारात शॉट सर्किटमुळे आग लागून साडेतीन एकर लागवड केलेल्या उसाला आग लागली. असोला शिवारात गट क्र 418 मध्ये सविता विनायक भरोसे यांची शेती आहे.विजेच्या शॉट सर्किट मुळे आग लागून सविता विनायक भरोसे यांच्या उसाला आग लागल्याने दोन तासात सुमारे साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला आहे.
पाथरी तालुक्यातील पोहे टाकळी येथे शॉटसर्किटमुळे आग लागून दीड एकर ऊस जळाला. पोहे टाकळी येथील शेतकरी दत्तात्रय सुंदरराव गोंगे यांची गट क्र.113 मध्ये 2 एकर शेती असून त्यात त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. सोमवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास विद्युत शॉट सर्किट होउन लागलेल्या आगीत दीड एकर ऊस जळून गेल्याची घटना घडली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon