kalyan rape case : 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास 7 वर्षाची सक्तमजुरीची ठोठावली शिक्षा


6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कल्याण मधील 49 वर्षीय नराधमास न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सक्त मजुरी शिक्षा 

कल्याण :
घराशेजारी रहात असलेल्या एका महिलेच्या घरात घुसून 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 49 वर्षीय नराधमास कल्याण मधील जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता पाहाडे यांनी आरोपीला 6 वर्ष 11 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

याप्रकारणात शिक्षा ठोठावली गेलेल्या आरोपीचे गोविंद जाधव असे नाव असून तो कल्याण मध्ये पीडित मुलीच्या घराशेजारी रहात होता. पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या कुटुंबियांना मिळाल्यावर बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी गोविंद जाधव याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो )अंतर्गत बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

सदर आरोपी मे 2015 पासून आधारवाडी कारागृहात होता. याप्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी व उपनिरीक्षक एफ एम शेख यांनी गुन्ह्याचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणाची 7 वर्ष न्यायालयात सुनावणी चालली.

सरकारी वकील म्हणून ऍड.अश्विनी भामरे, आरोपी तर्फे ऍड.अलीम शेख, ऍड.तृप्ती पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली, तर पोलीस-न्यायालयाची समन्वयक म्हणून हवालदार एस.जी निकम यांनी जबाबदारी पारपाडली.तपास, न्यायालयात कागदपत्रे सादरीकरणाचे काम हवालदार तेजश्री शिराळे,एकनाथ तायडे व सदानंद म्हात्रे यांनी केलं.

मात्र,या प्रकरणात आरोपी विरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराचे कलम तक्रार दाराकडून लावण्यात आले होते. त्याबाबतीत सबळ पुरावा न मिळाल्याने आरोपीची त्या कालमातून निर्दोष मुक्तता केली असल्याचे आरोपीच्या वकील तृप्ती पाटील यांनी सांगितले.




Previous
Next Post »