भद्रावती नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

भद्रावती नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात काम बंद आंदोलनाचे उपसले हत्यार 
चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे विविध मागण्या संदर्भात काम बंद  आंदोलन सुरु केल आहे. कंत्राटी सफाई कामगारांना 350 रोजंदारी मिळावी, सफाई कामगारांना पीएफ नंबर देण्यात यावा तसेच आठवड्यातून एक दिवस पगारी सुट्टी मिळावी यासाठी नगर परिषद भद्रावतीचे मुख्याधिकारी यांना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्यावतीने विकास दुर्योधन यांच्या नेतृत्वात अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे.

मात्र सफाई कामगारांच्या मागण्याकडे भद्रावती नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याने विकास दुर्योधन शहराध्यक्ष बीआरएसपी यांच्या नेतृत्वाखाली दि.28 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यन्त काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून कंत्राटी कामगारांनी शहराची साफसफाई चालू ठेवली. नगर परिषदेला स्वच्छता पुरस्कार मिळावा म्हणून आम्ही मेहनत घेतली. तसेच नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्ही साफसफाई करत असताना आम्हाला कुठल्याच सुविधा दिल्या जात नाहीत असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

त्यासाठी दि 28 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत झाडे प्लॉटवरील पाणी टॉकीजवळ विकास दुर्योधन,सागर नन्नावरे आणि अविनाश श्रीरामे यांच्या नेतृत्वात हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत.
Previous
Next Post »