पाथरीत 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाथरीतील माळीवाडा परिसरातील 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली, अकस्मित मृत्यूची नोंद
परभणी :पाथरी शहरातीत माळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.17 नोव्हेंबर रोजी माळीवाडा परिसरात राहणाऱ्या अनिल दत्तात्रय चिंचाने वय 24 या तरुणाने आयटीआय समोरील चौधरी यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

मध्य रात्री 12 ते 6 च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज आहे. आत्महत्या करण्यामागील कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र कुठल्यातरी नैराष्यातून ही आत्महत्या केल्याचे कळते.या प्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख गौस करीत आहेत.
Previous
Next Post »