त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेदार्थ परभणीत आंदोलन
परभणी :परभणीत मुस्लीम समाजाच्या वतीने दि.12 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचारच्या निषेदार्थ परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आंदोलन करण्यात आले आहे.पालम,पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मुस्लीम बांधवानी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करून आरोपीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी करिता सर्व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
परभणी शहरात मोठ्याप्रमाणात मुस्लिम बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. व्यापाऱ्यांनी सकाळ पासून दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. दुपारी 2 वाजेच्या सुमारास शहरातील मुस्लिम बांधव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झाले. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. या घटनेतील समाज कंठकांना निमलष्करी दला मार्फत तात्काळ अटक करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी व मुस्लिम समाजावर होणारे अन्याय अत्याचार तात्काळ थांबवावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावेळी परभणी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon