औरंगाबाद मध्ये बीआरएसपीकडे वाढला लोकांचा कल ;दर रोज होत आहेत पक्ष प्रवेश

औरंगाबाद शहरात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये विविध जातीधर्माचे लोक करत आहेत पक्ष प्रवेश
औरंगाबाद :बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक लोक दर रोज बीआरएसपी मध्ये प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरातील सर्वच जाती धर्माचे लोक पक्ष प्रवेश करत आहेत.काल 8 नोव्हेंबर रोजी औरंगाबादचे तरूण तडफदार जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या उपस्थितीत अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.पक्ष प्रवेशानंतर शेख नईम शेख हबीब यांची शहर उपाध्यक्ष पदी तर शेख इरफान शेख शब्बीर यांची शहर सचिव पदी निवड करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे हे नेहमीच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात. सर्वसामान्य,गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे,आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी लढा देत असतात. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यामुळे औरंगाबाद शहरातील विविध जाती धर्माचे व संघटनाचे पदाधिकारी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये प्रवेश करत आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष राजु निकाळजे,जिल्हा उपाध्यक्ष अजीमभाई वणीकर,शहर अध्यक्ष सय्यद निसार,जिल्हा महासचिव नितेश तांगडे, सय्यद नुसरत,मुमताज आली(जिल्हा सचिव ),आकाश चौथमल (शहर उपाध्यक्ष ),शेख मुक्तार शेख गुलाब (शहर उपाध्यक्ष ),काझी मुबशीर काझी मशकरुद्दीन(वॉर्ड अध्यक्ष रहमानिया कॉलनी )सुभम नवगिरे वार्ड अध्यक्ष इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.
Previous
Next Post »