बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षामध्ये लोकांचा पक्ष प्रवेशाचा ओघ चालूच

औरंगाबाद मध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या गाव तिथे शाखा अभियानाला मोठा प्रतिसाद
औरंगाबाद :बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)च्या गाव तिथे शाखा अभियानाला औरंगाबाद मध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.डॉ सुरेश माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध समाजातील सामाजिक व राजकीय पक्षातील लोक पक्षात सामील होत आहेत. औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे शाखा हे अभियान राबविण्यात येत असून दर रोज गाव व वार्ड पातळीवर पक्ष प्रवेश होत आहेत. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात बीआरएसपी हा एकमेव पक्ष आहे ज्यामध्ये विविध समाजातील लोक प्रवेश घेत आहेत.येणाऱ्या काळात औरंगाबादच्या राजकारणात बीआरएसपी हा मजबूत आणि निर्णायक भूमिका वठणारा पक्ष ठरणार आहे.

काल 10 नोव्हेंबर रोजी गाव तिथे शाखा या अभियाना अंतर्गत जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पारपडला. पक्ष प्रवेशानंतर काहींना पक्षाची जिमेदारी सुद्धा देण्यात आली. या मध्ये मोसीन खान यांची कन्नड युवा तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर मोहम्मद असरार यांची बेरीबाग हर्सूल वार्ड अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष राजु निकाळजे,जिल्हा उपाध्यक्ष अजीमभाई वणीकर,सय्यद निसार शहर अध्यक्ष,नितेश तांगडे जिल्हा महासचिव,नुसरत सर जिल्हा सचिव,शेख इरफानभाई शहर महासचिव,सुभम नवगिरे वार्ड अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng