औरंगाबाद शहरात मुस्लीम समाजाची बीआरएसपीला पसंती ; मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांचा दर रोज होतोय बीआरएसपीत पक्ष प्रवेश

औरंगाबाद शहरात बीआरएसपीला मुस्लिम समाजाची पसंती, दर रोज होतात पक्ष प्रवेश 
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने मजबूत पकड निर्माण केली असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संविधान तज्ञ ऍड. डॉ सुरेश माने यांच्यावर तसेच औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून लोक मोठ्यासंख्येने पक्षात प्रवेश करत आहेत. जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेऊन शासन दरबारी मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन औरंगाबाद शहर व इतर तालुक्यात दर रोज महिला व पुरुष सामाजिक व इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते बीआरएसपी मध्ये प्रवेश करत आहेत.
मुस्लीम समाजाची बीआरएसपीला पसंती
औरंगाबाद शहरात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने चांगलं मजबूत संघटन निर्माण केलं आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने चांगली मजबूत स्थिती निर्माण केली असून बीआरएसपी हा नवा राजकीय पर्याय लोकांना पसंतीचा वाटत आहे. सर्वात जास्त मुस्लीम समाज बीआरएसपीला पसंत करताना दिसत आहे. शहरात कुठे ना कुठे दर रोज मुस्लिम समाजातील कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत. लोकांचा बीआरएसपीकडे वाढता कल पहाता औरंगाबाद शहरातील प्रस्थापित राजकीय पक्षांना बीआरएसपी चांगलीच टक्कर देणार असल्याचे सध्या चित्र आहे.
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बीआरएसपी महिला आघाडी शाखा फलकाचे उदघाटन 
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून टीव्ही सेंटर येथील चौकात बीआरएसपी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लता सरदार यांच्या नेतृत्वात बीआरएसपी शाखा नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.तसेच या प्रसंगी चाँद बाबामिया यांची शहर सचिव पदी तर शेख अफरोज यांची बेरी बाग वॉर्ड अध्यक्ष पदी आणि विलास भुमरे वाहतूक आघाडी पुर्व अध्यक्ष पदी नियुकी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष -अरविंद कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष-राजु निकाळजे, लता सरदार-  महिला जिल्हाध्यक्षा, सय्यद निसार -शहर अध्यक्ष, शेख अजीमभाई वणीकर -जिल्हा उपाध्यक्ष, शेख मुक्तार- जिल्हा उपाध्यक्ष, संदीप ढिलपे - युवा जिल्हाउपाध्यक्ष, विकास वाव्हळ - शहरअध्यक्ष -कामगार आघाडी, शेख मोसीन -शहरअध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी,शेख इरफान -शहर उपाध्यक्ष, शेख फईम -शहर महासचिव,शेख हमीद - पूर्व शहरअध्यक्ष, शिवाजी मैशमाळे - पूर्व सचिव,शेख हाफिस पूर्व सचिव,निर्मला पेटारे पश्चिम अध्यक्ष, वर्षा जाधव पूर्व अध्यक्ष,दुर्गाबाई निकम पूर्व उपाध्यक्ष,वंदना जाधव -वार्ड अध्यक्ष सिद्धार्थ नगर, शुभम नवगिरे वार्ड अध्यक्ष,शेख नजीर वॉर्ड अध्यक्ष आरती नगर, कुमार वाघमारे प्रसिद्धी प्रमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठयासंख्येने उपस्थित होते.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng