संविधान जनजागृती करण्यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून माझे संविधान माझा अभिमान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे
परभणी : 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने संविधान जनजागृती करण्यासाठी 'माझे संविधान,माझा अभिमान 'या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या दरम्यान वक्तृत्व ,निबंध, चित्रकला,रांगोळी इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
26 नोव्हेंबर रोजी सर्वत्र संविधान दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता विद्यार्थ्यांना समजावी आणि राज्य घटनेतील मुलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविली जावीत यासाठी शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची संपूर्ण ओळख होने अतिशय महत्वाचे आहे. म्हणून संविधान जनजागृती करण्यासाठी 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत 'माझे संविधान,माझा अभिमान 'हा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत वर्ग तिसरी ते पाचवी,सहावी ते आठवी,नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध टप्प्यातर्गत वक्तृत्व, निबंध,चित्रकला काव्य लेखन, भिंती पत्रक तयार करणे,घोषवाक्य,आणि रांगोळी इत्यादिंचा यात समावेश आहे. त्याचबरोबर प्राथमिक ते उच्चमाध्यमिकच्या शिक्षकांसाठी फलक लेखन व डिजिटल पोस्टर निर्मिती असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
कोरोना मुळे ज्या ज्या शाळा बंद आहेत त्या शाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे.या उपक्रमात तयार केलेले व्हिडिओ व इतर साहित्य फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व अन्य समाज माध्यमातून प्रसिद्ध करायचे आहेत. यासाठी ऑनलाईन लिंक वरिष्ठ कार्यकायाकडे सादर करावयाच्या आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon