परभणी जिल्ह्यात 194 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

एसटी महामंडळाकडून निलंबणाची कार्यवाही होत असताना कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरूच
एसटी कर्मचारी मागील 24 दिवसापासून आपल्या मागणी साठी संपावर आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपवार आहेत. त्यामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.संपावर तोडगा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगार वाढीचा प्रस्ताव समोर ठेवला आहे परंतु कर्मचारी राज्य सेवेत विलीनिकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने कठोर पावले उचली असून कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवार निलंबणाची कार्यवाही सुरु केली आहे.

परभणी जिल्ह्यातील संपात सहभागी असलेल्या 194 कर्मचाऱ्यांवार शनिवारी निलंबणाची कार्यवाही करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचारी शंभर टक्के संपावर आहेत त्यामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्यात अजून एकही एसटी धावली नसल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

राज्य परिवहन मंडळाकडून पगार वाढ देखील करण्यात आली असून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.मात्र कर्मचारी विलीनकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने संप चालूच आहे.जिल्ह्यातील चारही आगारातील कर्मचारी शंभर टक्के संपात सहभागी आहेत. निलंबन केलेल्यामध्ये विभागीय कार्यालयातील लिपिक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.जिल्ह्यातील चारही आगारातून सरासरी 20 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे तरी सुद्धा सोमवारी शंभर टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले असल्यामुळे जिल्ह्यात एकही बस रस्त्यावर धावली नाही. 
Previous
Next Post »