परभणी : तथागत गौतम बुध्द यांची जयंतीसोमवारी 26 मे रोजी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर, प्रत्येक नगरात व गावा गावात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्त परभणी शहरात बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून धम्म शांती संदेश मिरवणूक काढण्यात आली.
बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातील प्रत्येक नगरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध जयंती निमित्त सकाळी 8 वाजता शहरातील शनिवारी बाजार येथून धम्म संदेश रॅलीला सुरुवात झाली. लोक नेते विजय वाकोडे यांच्या हस्ते रॅलीचे उदघाटन झाले. ही धम्म संदेश मिरवणूक शनिवारी बाजार येथून शिवाजी चौक, गांधी पार्क, विसावा कॉर्नर, स्टेशन रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर पर्यंत काढण्यात आली.
या धम्म रॅली मध्ये भिक्खू संघ, श्रामनेर संघ व उपासक उपासिका मोठ्या संख्येने हभागी झाले होते.याठिकाणी बुध्द वंदना घेऊन धम्म रॅलीची सांगता करण्यात आली.
धम्म रॅली मध्ये बुद्ध मूर्ती व विविध आकर्षक देखावे नागरिकांचे आकर्षक बनले होते.बुद्धम शरणं गच्छामीच्या जयघोषाने मंगलमय वातावरणात ही धम्म रॅली संपन्न झाली.
या धम्म रॅली मध्ये पूज्य भन्ते मुदिता नंद,महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक गौतम मुंढे,बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ झोडपे,विश्वनाथ वाघमारे, धबाले,नागेश सोनपसारे,अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे,प्रा. सुनील तुरुकमाने,राहुल वहिवाळ,उमेश शेळके,पंकज खेडकर, आशिष वाकोडे,संजय अदोडे,प्रा. अतुल वैराळ,प्रमोद पुंडगे, सचिन पाचपूंजे,यशवंत खाडे,अनिल ढाले, हर्ष काळे,राजु शेळके, राजेश भोसले,राहुल घनसावंत, लखन जमकर, गौतम खिल्लारे,अशोक खरात,अनिल वाघमारे, प्रा. डॉ अनिता गायकवाड,द्वारकाबाई गंडले,लक्ष्मीबाई बनसोडे,गंगुबाई आठवले यांच्यासह मोठयासंख्येने नागरिक सहभागी झाले होते.
ConversionConversion EmoticonEmoticon