सोसिअल मीडियावर वायरल झालेल्या खुल्या सैन्य भरतीच्या बनावट जाहिरातीने तरुणांना आर्थिक व मानसिक ताप सहन करण्याची वेळ आली
परभणी :परभणीत खुली सैन्य भरती होणार आहे अशी जाहिरात सोसिअल मीडिया वर फिरत होती.या समाज माध्यमातून फिरत असलेल्या खुल्या सैन्य भरतीच्या जाहिरातीवर तरुणांनी विश्वास ठेवून रविवारी भरतीसाठी परभणी गाठली.तरुणांनी भरती संदर्भात चौकशी केली असता सोसिअल मीडिया वर फिरत असलेली जाहिरात बनावट असल्याचे कळले.
परभतीत खुली सैन्य भरती होणार आहे अशा प्रकारची जाहिरात अनेक दिवसापासून व्हाट्सअप्प ग्रुप वर फिरत होती. अनेक तरुण यासंदर्भात चौकशी करत होते. परंतु अनेक तरुणांनी या जाहिरातीवर विश्वास ठेवून रविवारी भरतीसाठी परभणी गाठली.परंतु भरतीसादर्भात चौकशी केल्यानंतर अशा प्रकारची परभणीत कोणतीही भरती नसल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर याने सांगितले.
परभणी येथील पोलीस मुख्यालयात खुली सैन्य भरती होणार असल्याची जाहिरात मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील व्हाट्सअप्प ग्रुप व अन्य सोसिअल मीडिया वर फिरत होती.या जाहिरातीत शारीरिक व शैक्षणिक पात्रता,तसेच वयोमर्यादा यासोबत भरतीच्या ठिकाणासह विविध जिल्ह्याच्या तारखा आणि भरती संबंधी कागद पत्राची माहिती देण्यात आली होती. परंतु अशा प्रकारची कोणतीही सैन्य परभणीत नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर यांनी स्पष्ट केले. अफवावर विश्वास ठेवल्याने अनेक तरुणांना मानसिक ताप सहन करावा लागला.
ConversionConversion EmoticonEmoticon