3 हजार एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कार्यवाही

संपात सहभागी असलेल्या 3 हजार एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कार्यवाही करण्यात आली.
राज्यातील एसटी कर्मचारी मागील अनेक दिवसापासून संपावर आहेत. या संपादरम्यान निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मंगळवारी 3 हजारावर गेली आहे. या अगोदर 2 हजार 967 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी आणखी 85 कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कार्यवाही करण्यात आली आहे.एसटी कर्मचारी संप मागे घेत नाहीत तोपर्यंत निलंबणाची कार्यवाही अशीच सुरु राहणार असल्याचे एसटी महामंडळाने या आधीच स्पष्ट केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनिकरण आणि इतर मागण्यासाठी सुरुवातीला बंद झालेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारातून मंगळवारी एसटी वाहतूक सुरु झाली. या आगारातून तीन बस सोडण्यात आल्या.मात्र या बस रिकाम्याचं धवल्या असल्याचे कळते.मंगळवारी राज्यात विविध विभागातून 236 बस सुटल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली आहे.

आतापर्यंत निलंबणाची कार्यवाही केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 967 होती. त्यात मंगळवारी आणखी  निलंबित कर्मचाऱ्यांची भर पडली असून आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 3 हजार 52 पर्यंत पोहचली आहे.या मध्ये रोजंदारीवर असलेल्या 645 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच संप काळात वेतन ना देण्याचा एसटी महामंडळ विचार करत असल्याचेही कळते आहे.

 मंगळवारी राज्यातील एसटी वाहतूकीत वाढ झालेली आहे. विविध विभागातून सोमवारी 117 बस सोडण्यात आल्या होत्या. त्यातून 4 हजार 848 प्रवाशांनी प्रवास केला होता. तर मंगळवारी 236 बस सोडण्यात आल्या होत्या त्यातून 4 हजार 227 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.संपादरम्यान बंद असलेल्या सांगली जिल्ह्यातील बस सेवा मंगळवारी सुरु झाली.आटपाडी आगारातून 3 बस सोडण्यात आल्या असून या बस आटपाडी ते भिवघाट दरम्यान धवल्या आहेत.

Previous
Next Post »