राजकीय द्वेशापोटी मोदी सरकारने केले खेळ रत्न पुरस्काराचे नामांतर

खेळ रत्न पुरस्काराचे नामांतर :
भारतात क्रीडाक्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार या नावाने दिला जात होता. काल प्रधानमंत्री मोदींनी राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार असं करण्यात आले. क्रीडाक्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं खेळाडूचा सन्मान व्हावा आणि खेळाडूंनी स्वतःच आणि देशाचं नाव लौकिक करावं या साठी हा खेळ रत्न पुरस्कार भारत सरकार कडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. आधीच्या काँग्रेस सरकार ने या पुरस्काराला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार हे नाव दिल होतं परंतु आता ते भाजपा मोदी सरकारने नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार असं ठेवलं आहे. करं पाहिलं तर मेजर ध्यानचंद यांच्या नावाला  देशातील कोणत्याही नागरिकाला आक्षेप नाही आणि नसणार ही परंतु ज्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीचेच नाव असले पाहिजे असं जर केंद्रातील भाजपा- मोदी सरकार ला वाटत असेल तर प्रधानमंत्री मोदीजी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या क्रीडाप्रकारात त्यांनी देशाचं नाव लौकिक केलं आहे ज्यामुळे अहमदाबाद च्या मोटेरा क्रिकेट स्टेडियम ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. मोदीजी च्या शिक्षणाची सुद्धा पुरेशी माहिती नाही ते काय शिकले कोणत्या पदव्या मिळवल्या किती खेळमध्ये त्यांनी सहभाग घेऊन राज्याच किंवा देशाचं नाव लौकिक केलं. मग मोटेरा स्टेडियमला मोदींचं नाव देताना इथे कोणता निकष लावला. फक्त राजकीय सत्तेचा पाहिजे तसा वापर करून घेणे हाच एकमेव निकष सत्ताधाऱ्यांचा असतो.म्हणून खेळ राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराला नाव देणं म्हणजे राजकीय द्वेशापोटी घेतलेला निर्णय आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे देशात वाढत चाललेली महागाई, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी या सारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता पुरस्काराचे नाव बदलण्याची मोठी कामगिरी मोदींनी केली आहे. ज्या निर्णयाचा देशातील कोणत्याच व्यक्तीचा आज घडीला फायदा नाही. केवळ राजकीय हेतू ठेऊन तिरस्काराच्या भावनेने भाजपा-मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे एवढेच.
English translation :
Khel Ratna Award renamed:

 The highest award in the field of sports in India was the Rajiv Gandhi Khel Ratna Award.  Yesterday, Prime Minister Modi changed the name of Rajiv Gandhi Khel Ratna Award to Major Dhyanchand Khel Ratna Award.  The Khel Ratna Award is given by the Government of India to the best performing players in order to encourage the best performing players in the field of sports, to honor the players and to make the players famous for themselves and the country.  The previous Congress government had given the name Rajiv Gandhi Khel Ratna Award but now the BJP Modi government has changed the name to Major Dhyanchand Khel Ratna Award.  If the BJP-Modi government at the Center thinks that Major Dhyanchand's name is not and will not be objected to by any citizen of the country, then what sport does Prime Minister Modiji belong to?  Motera Cricket Stadium in Ahamadabad has been named after Prime Minister Narendra Modi.  Even Modiji's education is not enough to know what he learned, what degrees he got, how many sports he participated in and made the name of the state or country famous.  Then what criteria was set while naming the Motera Stadium after Modi.  The only criterion of the ruling party is to use political power as it pleases. Therefore, renaming the Khel Rajiv Gandhi Khel Ratna award to Major Dhyanchand Khel Ratna award is a decision taken out of political hatred.  Most importantly, Modi has done a great job of changing the name of the award, ignoring the common man, such as rising inflation and rising unemployment in the country.  A decision that does not benefit any person in the country today.  The BJP-Modi government has taken this decision only out of hatred for political motives.


Previous
Next Post »