महाराष्ट्रात सर्वत्र शेतकरी राजाचा सण "बैल पोळा" साजरा
जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या शेतात वर्षभर रात्रंदिवस राबराब राबतो. ऊन असो पाऊस असो की थंडी असो अशा सर्वच ऋतुत धान्य पीकविण्यासाठी कष्ट करत असतो. जसा सैनिक देशाचं संरक्षण करण्यासाठी सिमेवर रात्रंदिवस तैनात असतो तसाच शेतकरी सुद्धा देशाला अन्नधान्या पुरवून जगविण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत राहतो.म्हणून तर आपण अभिमानाने जय जवान जय किसान असं नेहमी बोलतो. शेतकऱ्याच्या कष्टाचा सर्वात मोठा भार हा बैलावर असतो.
हजारो वर्षांपासून शेती ही बैलाच्या मदतीने कसली जाते. नांगरणी कोळपणी शेतीमालाची वाहतूक अशी सर्व कामे बैलाच्या मदतीने केली जात असत आणि म्हणून वर्षातून एक दिवस बैलांना विश्रांती आणि त्यांच्या कष्टाचं मोल म्हणून त्यांना विविध रंगाने व घुंगराच्या माळा घालून अंगावर आकर्षक कपड्यांच्या झुलीचा साज चढवून मिरवणूक काढली जाते त्यांची पूजा अर्चा करून त्यांचा सन्मान केला जातो यालाच "बैल पोळा" म्हणतात.महाराष्ट्रात शेतकरी बांधव हा सण मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करतात.
शेतकऱ्यांच्या संबंधाने आपण आणखी एक वाक्य नेहमी बोलतो "ईडा पीडा टळूदे; बळीच राज्य येऊ दे".बळीच राज्य येऊ दे म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी बळी नावाचा राजा होता बळी राजा हा शेतकऱ्याच्या हिराचा राजा होताशेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारा राजा होता त्यामुळे त्यांच्या राज्यात शेतकरी हा सर्व गोष्टीने धनवान होता.शेतकऱ्यला कुठल्याच गोष्टीची कमी "बळी" च्या राज्यात नव्हती.परंतु कपट कारस्थानाने बळी राजाला ठार मारण्यात आलं आणि तेव्हा पासून शेतकरी हिताचा कोणी राजा झाला नाही. म्हणून तर बळीच्या राज्यासारखं राज्य पुन्हा य्यावे म्हणून तर ईडा पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे असं शेतकरी बांधव नेहमी म्हणत असतो.
आताच्या आधुनिक काळात शेती ही आधुनिक कृषी यंत्राच्या साहाय्याने केली जात असली तरी देशातील 80 टक्के शेतकरी आजही बैलाच्या मदतीनेच शेती कारतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तर शेती व्यवसाय हा बैलाच्या मदतीनेच केला जातो.म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा सण "बैल पोळा" काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
Farmer King's festival "Bail Pola" is celebrated all over Maharashtra
The world's breadwinner plows his fields day and night throughout the year. He works hard to grow grain in all seasons, whether it is raining or cold. Just as soldiers are deployed day and night on the border to protect the country, so too farmers work hard day and night to provide food to the country. That is why we always proudly say Jai Jawan Jai Kisan. The biggest burden of the farmer's labor is on the ox.
For thousands of years, farming has been done with the help of oxen. All the work of plowing, plowing and transporting agricultural goods was done with the help of oxen and therefore one day in a year the oxen are rested and as a reward for their hard work they are adorned with garlands of various colors and garlands and adorned with attractive garments. In Maharashtra, farmers celebrate this festival with great joy.
In relation to the farmers, we always say one more sentence, "Ida avoid pain; let the victim state come". What is the victim state? In the past, there was a king named Bali. Bali Raja was the king of the farmer's diamond. He was the king who made decisions in the interest of the farmer. Since then no farmer has become king. Therefore, the farmer brother always says that in order for the state to come back like the state of the victim, let the suffering state be avoided.
In modern times, agriculture is done with the help of modern agricultural machinery, but 80% of the farmers in the country still cultivate with the help of oxen. In Maharashtra, most of the agricultural business is done with the help of oxen.
ConversionConversion EmoticonEmoticon