खैरलांजी हत्याकांडाला 16वर्ष झाली पीडित कुटुंबाला न्याय मिळाला का?
काल 29 सप्टेंबर रोजी खैरलांजी हत्याकांडाला 16 वर्ष झाली.पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा लावणारं हत्याकांड 29 सप्टेंबर 2006 रोजी खैरलांजी या गावी घडलं. बौद्ध कुटुंबातील चार जनाची अमानुसपणे हत्या करण्यात आली. जातीवादी गावागुंडाकडून हे हत्याकांड करण्यात आलं. या हत्याकांडाचे वर्णन करताना हृदय हेलावून जाते. भावासमोर बहिणीवर बलात्कार होतानाची अमानवी घटना घडते.
ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. जिथे अशा प्रकारे एकाच कुटुंबातील एक भाऊ दोन बहिणी आणि आई अशा चार जनाची गवातील जातीवादी गुंडाकडून हत्या केली गेली.भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या गावाची ओळख जगाच्या पटलावर झाली ती एका दुर्दैवी घटनेने. ती म्हणजे खैरलांजी हत्याकांडाने. या दुर्दैवी घटनेच्या निषेदार्थ संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला. निषेध मोर्चे आंदोलन रस्ता रोको रेल रोको करून महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेनं अशा प्रकारे रोष व्यक्त करून राज्य सरकारला हदरवून सोडलं होत.
आंबेडकरी जनतेचा राग आणि आंदोलनाची तीव्रता पाहून तत्कालीन राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी हत्याकांडाचा निषेध करणाऱ्या आंदोलकांना नक्षलवादी म्हणून गुन्हे दाखल करण्यात येतील असं सांगितलं.बौद्ध समाजातील शेकडो तरुणांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमधील नेत्यांनी हत्याकांडातील आरोपीना पाठीशी घातलं.तपासातील पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणून योग्य तो तपास होऊ दिला नाही.
पोलीस तपासापासून शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टर पर्यंत सर्वांनीच या हत्याकांडातील पीडित कुटुंबावर अन्याय केला.हत्याकांडाच्या चार दिवसानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय सहानुभूती मिळविणाऱ्या नेत्याला हत्याकांड होण्याआधी याबाबतीत माहिती दिली होती.परंतु कुठलीच मदत या नेत्याकडून झाली नाही.नेते फक्त समाजाच्या नावाने राजकारण करून प्रसिद्ध मिळविणे आणि प्रसिद्धी मिळाली राजकीय लाभ मिळवून आपली पोळी भाजून घेतात.या हत्याकांडातील कुटुंब प्रमुख भैयाजी भोतमांगे हे या कात्याकांडातून वाचले होते. त्यांनी आपल्या कुटुंबावर झालेल्या अत्याचारला न्याय मिळावा म्हणून निकराची न्यायालयीन लढायी लढली.हत्याकांडाती चार आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली आणि दोन आरोपीना जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.काल 29 सप्टेंबरला या दुर्दैवी घटनेला 16 वर्ष.परंतु भोतमांगे कुटुंबाला खरचं न्याय मिळाला का याचे पुरोगामी म्हणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेनं आत्म चिंतन करावे.निशब्द निषेध निषेध निषेध.
16 years after Khairlanji massacre, did the victim's family get justice?
Yesterday, September 29, was the 16th anniversary of the Khairlanji massacre. Four members of a Buddhist family were brutally murdered. The massacre was carried out by casteist gangsters. It is heartbreaking to describe this massacre. An inhuman incident occurs when a sister is raped in front of a brother.
This is the only event in the history of Maharashtra. Khairlanji, a village in Mohadi taluka of Bhandara district, became known to the world through an unfortunate incident. That is the Khairlanji massacre. The whole of Maharashtra took to the streets in protest of this unfortunate incident. The people of Ambedkar in Maharashtra had expressed their indignation and rocked the state government by blocking the road.
Seeing the anger of the people of Ambedkar and the intensity of the agitation, the then Home Minister RR Patil said that the protesters would be charged as Naxalites. Hundreds of Buddhist youths were forcibly evicted from their homes and false charges were filed against them. He did not allow the proper investigation to take place by putting pressure on the investigating police officer.
From the police investigation to the autopsy doctor, everyone did injustice to the victim's family. Four days after the murder, the leader who resigned as MLA and gained political sympathy was informed before the murder. But no help came from this leader. Bhaiyaji Bhotmange, the head of the family involved in the massacre, had survived the massacre. He fought a court battle to get justice for the atrocities committed on his family. Four accused in the murder case were sentenced to death and two others were sentenced to life imprisonment. Contemplate this notion.
ConversionConversion EmoticonEmoticon