राजकीय दंगल

देशातील राजकीय घडामोडीना उधाण :
अनेक राज्यात राजकीय घडामोडी होत असल्याचे दिसून येते. मागील आठवड्यात बसपा सुप्रिमो मायावती यांनी ब्राहमण संमेलन घेण्याची घोषणा केली.2007 मधे सोसिअल इंजिनीरिंग चा फॉर्मुला वापरून ब्राहमण समाजाला बसपा शी जोडलं आणि याचा फायदा सुद्धा झाला. पहिल्यांदाच बहुमताचं सरकार मायावती यांच्या नेतृत्वात स्थापन झालं. परंतु त्यानंतर बसपाचा आलेख घसरत गेला.2012 मधे समाजवादी पार्टी चं सरकार आलं.अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. बसपा ला 80 जागा जिंकता आल्या.त्यानंतर 2017 मधे तर बहुजन समाज पार्टी ला अवघ्या 19 जागावर समाधान मानावा लागलं. म्हणून पुन्हा 2007 ची पुनर्रावरती करण्याच्या उद्देशाने मायावतींनी ब्राहमण समाज संमेलन घेण्याची घोषणा केली आहे.
कर्नाटक सरकार मधील घडामोडी :
आठवडाभरापासून कर्नाटकातील राजकीय घडामोडीना वेग आला असून मुख्यमंत्री बी एस एडीयुरप्पा यांचा भारतीय जनता पार्टी ने राजीनामा घेतला असून मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्याची चाचपणी पक्षाकडून केली जात आहे. एकाच वर्षात 2 वेळा मुख्यमंत्री पदाची घेणारे बी एस एडीयुरप्पा यांना अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. "सत्तेसाठी काही पण " याप्रमाणे बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे राजीनामा द्यावा लागला त्यानंतर काँग्रेस च्या पाठिंब्यावर एच डी कुमारस्वामी यांचं मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन झालं आणि काही महिन्यातचं काँगेस आणि जनता दल (एस )चे आमदार फोडून कुमारस्वामी यांचं सरकार पाडण्यात एडुयुरप्पा यशस्वी होऊन पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले होते. परंतु पक्षांतर्गत बंडाळीमुळे पक्षाने एडीयुरप्पा यांचा राजीनामा घेतला आहे.
झारखंड सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या हालचाली :
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामधे पावसाच्या पुराणे थैमान घातले असून लाखो लोकांचं जनजीन विसकळीत झाले आहे त्यातच अनेक डोंगर पायथ्याशी असलेल्या गावावर दरडी कोसळून अनेकांना आपले जिव गमवावे लागले आहेत. राज्यात अशी कठीण परिस्थिती असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी चे नेते झारखंड सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे झारखंड सरकारने म्हटलं आहे. त्यासाठी सरकारच तपास पथक लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचे झारखंड सरकारकडून सांगितलं आहे.यावरून सत्तेसाठी काहीपण करण्याची भाजपाची नीती आहे.हे या ठिकाणी दिसून येते.

English translation:

Political developments in the country:

 Political developments are taking place in many states.  Last week, BSP supremo Mayawati announced a Brahmin convention. In 2007, using the formula of social engineering, she connected the Brahmin community with the BSP and benefited from it.  For the first time, a majority government was formed under the leadership of Mayawati.  But after that, the BSP's graph started declining. In 2012, the Samajwadi Party government came. Akhilesh Yadav became the Chief Minister.  The BSP won 80 seats. Then in 2017, the Bahujan Samaj Party had to settle for just 19 seats.  Therefore, Mayawati has announced to hold a Brahmin Samaj Sammelan with the intention of repeating 2007.

 Activities in the Government of Karnataka:

 Political developments in Karnataka have been in full swing for a week now with the resignation of Chief Minister BS Ediyurappa by the Bharatiya Janata Party (BJP) and the party is testing a new face for the post.  BS Ediyurappa, who has been the Chief Minister twice in the same year, finally had to resign.  After failing to prove a majority like "something for power", he had to resign. With the support of the Congress, HD Kumaraswamy's government was formed as the Chief Minister.  Was seated.  But due to internal rebellion, the party has resigned Ediyurappa.

 Movements of BJP leaders in Maharashtra to overthrow the Jharkhand government:

 In some districts of Maharashtra, millions of people have been displaced due to heavy rains and many people have lost their lives due to landslides in the foothills.  The Jharkhand government has said that the BJP leaders in Maharashtra are trying to overthrow the Jharkhand government in the face of such a difficult situation in the state.  The jharkhand government has said that the government will soon come to Maharashtra. The BJP's policy is to do anything for power. This can be seen here.

Previous
Next Post »