पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना शस्त्र विरोधी पथकाने केली अटक, 2 पिस्तूल 1 जिवंत राऊंड व मोटर सायकक केली जप्त
पुणे : गुरुवारी 30 जून रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांना दोन गावठी पुस्तूल घेऊन फिरत असतना पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाने केली अटक.वरिष्ठ्यांच्या सूचनेनुसार पो हवा.चंद्रकांत गवारी व पो हवा.प्रवीण मुळूक गस्त घालत असताना त्यांचे गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की आळंदी फाटा ते आळंदी जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गवते वस्ती चाकण येथे 2 तडीपार इसम ज्युपिटर मोटरसायकल वरून गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर शस्त्र विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याठिकाणी जाऊन सापळा लावून माधव उर्फ अप्पा रोहिदास गित्ते (वय 25 रा. चक्रपानी वसाहत भोसरी पुणे ) मूळ रा.सोमठाणा ता. कंधार जि. नांदेड व ओम उर्फ सोन्या रवी गावडे( वय 16)विधी संघर्षित बालक रा.बालाजी नगर चाकण ता खेड जि पुणे या दोघांना फिरत असताना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या कडे दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड सह मोटर सायकल सह एकूण 100300 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोप माधव उर्फ अप्पा गित्ते हा चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार असल्याने पुढील कार्यवाही साठी त्यांना चाकण पोलिस ठाणे येथे आर्म ऍक्ट 3 (25)तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),(3)अनुसार व बंदी आदेशाचे उल्लंघन केले असल्याने महाराष्ट्र कायदा कलम 142 अनुसार आरोपिंची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी चाकण पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.
सादरची कार्यवाही पिंपरी चिंचवड आयुक्त श्री अंकुश शिंदे,अप्पर पोलीस आयुक्त श्री डॉ धनंजय शिंदे, श्री काकासाहेब डोळे पोलीस उपयुक्त गुन्हे, सा पोलीस उपायुक्त पद्माकर घनवट पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे सा पो उपनिरीक्षक शिंदे,सा पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे,पो हवा. चंद्रकांत गवारी,पो हवा. प्रीतम वाघ,पो हवा. शेख, पो हवा वडेकर,पो कॉ प्रवीण मुळूक, पो कॉ मोसीन आत्तार व पो कॉ शेळके यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon