ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची बाजी:
आज खेळ विश्वात भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे.टॉकीयो येथे पारपडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनी सारख्या बलाढ्य संघाला धूळ चारून विजय मिळवून कास्य पदक मिळविले आहे खरोखरच भारतीयांच्या सिरपेचात मानाचा तुरा रोवाला आहे. भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.जर्मनी सारख्या संघाला मात देणं सोपं नसताना दमदार सराव आणि जिंकण्याची जिद्द संघातील प्रत्येक खेळाडूंने मनात ठेवून खेळाला सुरुवात केली. भारतीय हॉकी संघांचे कर्णधार मनरीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीपासून आघाडी घेत दमदार खेळ खेळून करो या मरो या जिद्दीने मैदानात सर्वस्व पणाला लावून जर्मनी विरुद्ध चा सामना 5-4 ने जिंकून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.या आधी 1980 मधे भारतीय हॉकी संघाचे कर्णधार वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वात मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. म्हणून आज तब्ब्ल 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने विजय प्राप्त करून कास्य पदक मिळवून भारतीयांना आनंदाची बातमी दिल्या बद्दल भारतीय हॉकी संघांचे सर्व भारतीयांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
ऑलिम्पिक मधे अन्य खेळामध्ये पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.
वेटलिफ्टिंग :या खेळमध्ये मिराबाई चानू सैखोम या महिला खेळाडूंने वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारात सिल्वर पदक मिळवून भारताचा गौरव वाढला.
बॉक्सिंग खेळ : बोरगोहईन लोवलीना ह्या खेळाडूंने बॉक्सिंग या खेळ प्रकारात कास्य पदक मिळवून देशाचं नाव उंचावलं.
बॅडमिंटन : बॅडमिंटन या खेळ प्रकारात हैदराबाद च्या पी व्ही. सिंधू या महिला खेळाडूंने कास्य पदक जिंकून देशाचं नाव जगात लौकिक केलं आहे. आता पर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत ज्या ज्या खेळाडूने पदक मिळविण्याची कामगिरी केली त्या सर्व खेळाडूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
English translation :Indian men's hockey team wins Olympics:
Today, in the sports world, there is good news for Indians. After 41 years in the Olympics held in Tokyo, the Indian men's hockey team has won a bronze medal by defeating a strong team like Germany. The Indian players performed well. While it was not easy to beat a team like Germany, every player in the team started the game with a strong practice and determination to win. Under the leadership of Indian hockey team captain Manrit Singh, the Indians were proud to win the match against Germany 5-4 with all their might on the field. He had won a gold medal in the Olympics held here. So, on behalf of all Indians, congratulations to the Indian hockey team on the victory of the Indian men's hockey team after 41 years of winning the bronze medal.
Congratulations to all the athletes who won medals in other sports at the Olympics.
Weightlifting: Mirabai Chanu Saikhom won a silver medal in weightlifting for India.
Boxing: Borgohin Lovelina won a bronze medal in boxing.
Badminton: In the sport of badminton, P. V Sindhu of Hyderabad has made the country famous in the world by winning a bronze medal. Heartiest congratulations to all the athletes who have won medals at the Olympics so far.
ConversionConversion EmoticonEmoticon