26 जुलै आरक्षण दिवस : महाराष्ट आणि संपूर्ण भारतातील sc,st आणि obc समाजातील लोकांसाठी आज आनंदाचा दिवस आहे .हजारो वर्षांपासून ज्या समाज घटकांना वर्ण व्यवस्थेच्या जुलमी परंपरेनं प्रगतीच्या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं होतं त्या समाजाला प्रस्थापित समाजाच्या बरोबरीला आणण्यासाठी छत्रपती शाहूजी महाराजांनी वेगवेगळे प्रयत्न केले आणि 1902 मधे कोल्हापूर संस्थानात बहुजन समाजाला 50 टक्के आरक्षण लागू केलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आरक्षणाची सुरुवात झाली आणि बहुजन समाजाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झाला . त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दे SC-ST वर्गातील समाजाला आरक्षण दिल आणि देशातील करोडो लोक आरक्षणाचा फायदा घेऊन सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नति करताना दिसत आहेत .मंडल आयोग लागू झाल्यानंतर 52 टक्के OBC समाजाला सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळत आहे . आरक्षणामुळे सवलती मिळतात म्हणून तर आज देशात अनेक जाती आरक्षण मिळावे म्हणून जिकडं तिकडं लाखोंच्या संख्येने मोर्चे काढताना आंदोलनं करताना आपण पाहत आहोत . म्हणून तर म्हणून तर देशातील बहुजन वादी आरक्षणाचा लाभ घेणारे लोकं 26 जुलै आरक्षण दिवस म्हणून साजरा करतात .धन्य ते छत्रपती शाहूजी महाराज .
English Translation :
26th July Reservation Day: Today is a day of joy for the people of sc, st and obc communities in Maharashtra and all over India. In 1902, 50 per cent reservation was imposed on the Bahujan Samaj in the State of Kolhapur and from there the real reservation started and the way was paved for the upliftment of the Bahujan Samaj. After Indian independence, Dr. Babasaheb Ambedkar gave reservation to the SC-ST community through the constitution and millions of people in the country are seen taking advantage of the reservation for social, educational and economic upliftment. After the implementation of Mandal Commission, 52 per cent OBC community is also getting reservation. As reservation gives concessions, today we are seeing millions of people marching in different parts of the country to get reservation. Therefore, people who take advantage of Bahujan Wadi reservation in the country celebrate 26th July as Reservation Day. Blessed is Chhatrapati Shahuji Maharaj.
ConversionConversion EmoticonEmoticon