सोशिअल मीडियावरून ओळख झाली आणि बीडच्या अल्पवयीन मुलीला थेट पश्चिम बंगालला पळवून नेले
बीड : सोशिअल मीडियावरून ओळख झाली, फोन नंबरची देवाण घेवाण आणि मग बोलने सुरु झाले. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.पठ्याने एकेदिवशी पश्चिम बंगाल वरून थेट बीड गाठलं आणि अल्पवयीन मुलीला पश्चिम बंगालला घेऊन गेला.दोघेही 6 महिने रांची येथे एकत्र राहिले. परंतु शेवटी बीड पोलिसांनी त्यांचा छडा लावला आणि 26 मे रोजी त्या दोघांना बीड पोलिसांनी बीडमध्ये आणलं.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज रंजित भगत (36 रा.उकरा ता असनसोल जि.दुर्गापूर पश्चिम बंगाल ) असे आरोपीचे नाव आहे.पळवून नेलेली 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी ही बीड मधील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.या मुलीचे स्टार मेकर ऍप्पवर सुरज भगत याच्याशी 6 महिन्यापूर्वी ओळख झाली होती.मोबाईल नंबरची एकमेकांनी देवाण घेवाण केल्या नंतर मोबाईल वरून बोलने सुरु झाले. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी एकेदिवशी पळून जाण्याचं नियोजन केलं.त्यानंतर सुरज भगत हा 14 जानेवारी 2022 रोजी बीडला आला आणि अल्पवयीन मुलीला घेऊन पश्चिम बंगालला घेऊन गेला.त्यानंतर रांची येथे खोली करून दोघेही राहू लागले. ते दोघेही मजुरी काम करून उदरनिर्वाह करू लागले.
दरम्यान इकडे मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र कुठेही सुगावा लागला नाही. शेवटी 17 जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार बीड मधील पेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवर,उपाधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस ठाण्याचे सा. पोलीस निरीक्षक केदार पालवे यांनी एक पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर,हवालदार सुभाष मोटे व पोलीस नाईक सुनील अलगट यांना पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले.
मुलीचा शोध घेऊन पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर न्यायालयात प्रवाशी प्रवाशी रिमांड घेऊन पोलीस पथक बिडला पोहचले.मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला बालकल्याण समितीसमोर हजर करून तिला बालगृहात ठेवण्यात आले आहे. तर आरोपी सुरज बघत यास 27 मे रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपीविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यासोबतच ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याची वाढ करण्यात आली आहे.
6 महिन्यानंतर मुलीचा मोबाईल सुरु झाला आणि अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागला. पोलीस शोध घेत होते मात्र सहा महिने मोबाईल बंद असल्याने थांग पता लागत नव्हता. परंतु 6 महिन्यांनी मुलीने मोबाईल सुरु केला आणि पोलिसांना सुगावा लागला.पेठ बीड पोलिसांनी शोध सुरु करून 23 मे रोजी पश्चिम बंगाल मधून दोघांना ताब्यात घेऊन बीड येथे आणले.ते दोघे नुकतेच रांची येथून गावी आले होते.
ConversionConversion EmoticonEmoticon