अंधश्रद्धेला बळी पडलेल्या महिलेची भोंदू कडून 32 लाखांची फसवणूक, आरोपी पवन पाटील यास अटक
भोंदू पवन पाटील याने आपल्या अंगात सप्तश्रुंगी मातेचा संचार असल्याचे भासवून कधी तळ हातातून खडी साखर, कुंकू आणि त्यामध्ये सप्तश्रुंगीदेवीची प्रतिमा काढून दाखवत असे. या चमत्कारी गोष्टी पाहून महिलेचा विश्वास बसला.त्यानंतर महिलेचा भाऊ आणि आई यांना सांगितले की तुमच्यावर कोणी तरी करणी केली आहे. त्याची बाधा तुमच्यावर आहे. ही करणी ची बाधा दूर करायची असेल तर त्यासाठी खर्च करावा लागेल असं आरोपी पवन पाटील याने सांगितले.
अंधश्रद्धेला बळी पडलेल्या प्रियंका राणे व तिच्या आई कडून 31 लाख 6 हजार 875 रुपये ऑनलाईन पेमेन्ट द्वारे मागवून घेतले नंतर 1 लाख 9 हजारांच्या भेट वस्तू देखील घेऊन 32 लाख 15 हजार 875 रुपयांची आमची फसवणूक केली असल्याचे प्रियंका राणे हिने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. सदर प्रकार 2019 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत डोंबिवली येथील तिच्या आईच्या घरी घडल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon