औरंगाबाद मध्ये रविवारी मध्यरात्री दोन खून, परिसरात एकच खळबल

औरंगाबाद मध्ये एक तरुण व एका महिलेचा एकाच रात्री दोन खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे 
औरंगाबाद : शहरात रविवारी मध्यरात्री दोन खुनाच्या घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
किरकोळ कारणावरून बायजीपुरा येथे मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली तर दुसरीकडे भाजी विक्रीकरणाऱ्या महिलेचा गळा चिरून हत्या केलेल्या अवस्थेत मृत देह आढळून आला आहे.एकाच रात्री शहरात दोन हात्येच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.

बायजीपुरा रस्त्यावर किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली तर बाळापूर शिवारात एका भाजी विक्रेत्या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृत देह आढळून आला आहे. याबाबतची माहिती चिखलठाणा आणि जिन्सी पोलिसांनी दिली आहे.बायजीपुरा रस्त्यावर खून झालेल्या तरुणाचे नाव शाहरुख अन्वर शेख (वय 18 )असे असून तो इंदिरा नगर गल्ली क्र.30 मध्ये रहात होता.मित्राने हल्ला केल्याने गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना त्याने मदतीसाठी याचना केली.मात्र कोणीही त्याच्या मदतीला आले नाही.तर त्याला भोकसणारा युवक हैदर खान उर्फ शाखेर जाफर खान (रा.संजय नगर गल्ली क्र.11) हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत.याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृत शाहरुख आणि हैदर खान हे दोघेही रात्रीच्या वेळेस बायजीपुरा रस्त्यावरील सिकंदर हॉल समोर बसले होते. त्या दोघांनी नशा केली होती.त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. दरम्यान हैदर याने स्वतः जवळील चाकूने शाहरुख याच्यावर कमरेत, बरगाडीत व पायावर सपासप वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही पोलीस रेकॉर्ड वर गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

भाजी विक्रेत्या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृत देह
 औरंगाबाद मधील टीबी इस्टेट परिसरात एका 35 वर्षीय महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृत देह सोमवारी सकाळी आढळून आला आहे. मृत महिला ही 10 वर्षापासून पती पासून विभक्त रहात होती. मृत महिलेचं नाव सुशीला असे असून त्या आपल्या तीन पाल्यासह मुकुंद वाडी परिसरातील अंबिका नगर मध्ये रहात होत्या. एक मुलगा 22 वर्षाचा असून दोन मुली आहेत.त्या भाजी विक्रीकरून आपला उदरनिर्वाह करत होत्या. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Previous
Next Post »