सांगलीत हृदय हेलवणारी घटना : जेवण न दिल्याने मुलाने जन्म दात्या आईची केली हत्या

जेवण न दिल्याच्या कारणावरून मुलानेच केली जन्मदात्या आईची निर्घृन हत्या 

सांगली : 
 सांगलीतील कवठे महांकाळ येथे हृदय हेलवणारी घटना घडली आहे. एका निष्ठुर मुलाने आपल्याच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे.जेवण न दिल्याच्या करणानाने मुलाने जन्मदात्या आईची दगड वीट व लोखंडी फुकणी ने मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुलाला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हत्या झालेल्या 70 वर्षीय महिलेचं नाव राजाक्का ज्ञानू जाधव असे असून त्या कवठे महांकाळ मधील अगळगाव येथे रहात होत्या. दशरथ जाधव असे अटक झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.दशरथ जाधव हा आगळगाव येथील पाटील मळ्यात रहात होता. त्याला दारूचे व्यसन होते.दशरथ हा अनेकदा दारूच्या नशेत आई सोबत भांडण करायचा. तसेच तो मारहाण देखील करत असे.अशी माहिती शेजारी राहणाऱ्यांनी दिली आहे.

मृत राजाक्का ज्ञानू जाधव यांनी घटनेच्या दिवशी मुलाला जेवण दिले नव्हते. जेवण दिले नाही म्हणून राग आल्याने आरोपी मुलगा दशरथ जाधव याने दगड विटा आणि लोखंडी फुकणीने मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना मिरज येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना राजाक्का जाधव यांचा मृत्यू झाला. जन्मदात्या आईची मुलाने निर्घृण हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी मृत महिलेचा नातू गणेश भोसले यानी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दाखल तक्रारीवरून विविध कालमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून चौकशी करण्यात येत आहे.



Previous
Next Post »