पुण्यात पोलिसच उठला पोलिसाच्या जीवावर ; सहकारी पोलीसाला मारण्याची दिली गुंडाला सुपारी

पुण्यात पोलिसानेच पोलिसाचा काटा काढण्याची दिली गुंडाला सुपारी 
पुणे : पुण्यात पोलिसांनेच सहकारी पोलीस कर्मचाऱ्यास जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याची खळबळ जनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.यात सहकारी पोलिसाला मारण्यासाठी चक्क पोलीस रेकॉर्डवर असलेल्या गुंडाला सुपारी दिल्याची बाब समोर आली होती.या प्रकरणी दत्ता वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटकही केली आहे.या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याने सहकारी पोलिसाला मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली होती.दरम्यान या प्रकरणात योगेश प्रल्हाद अडसूळ याला अटक केली असून पोलीस अंमलदार नितीन दुधाळ हा सध्या फरार आहे.याबाबत पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील बाळासो लोहार यांनी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस अंमलदार नितीन दुधाळ हा फरास खाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.तसेच दत्त वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी हे नितीन दुधाळ याच्या शेजारीच राहत होते. परंतु त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्याचा मनात राग धरून नितीन दुधाळ यांनी पोलीस रेकॉर्ड वर असलेल्या योगेश अडसूळ या गुन्हेगाराला सुपारी दिली होती.या बाबतीत योगेश अडसूळ याने दत्त वाडीतील एका व्यक्तीला पोलीस कर्मचाऱ्यावर पाळत ठेवत पूर्ण माहिती घेण्यासाठी सांगितले होते. त्याकाठी त्याला दहा हजार रुपये देखील योगेश अडसूळने दिल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस कर्मचाऱ्याची सुपारी दिल्याची माहिती दत्त वाडी पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता योगेश अडसूळ याने त्याला 10 हजार रुपये दिले असल्याची माहिती दिली. पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करून अपघात घडविण्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने दिली. त्यानुसार योगेश अडसूळ याला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाची सुपारी देणारा पोलीस अंमलदार नितीन दुधाळ मात्र सध्या फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत अहेत.

Previous
Next Post »