अहमदाबाद : गुजरातमध्ये महसूल गुप्तचर विभागाने मोठी कार्यवाही करत तब्ब्ल 500 कोटी रुपयांचे कोकेन ड्रग्स जप्त केलं आहे. विशेष मीठ असल्याचे सांगून इराणहून गुजरात मध्ये हे ड्रग्स आणल्या गेलं आहे.हे कोकेन ड्रग्स ज्या मालवाहू जहाजावरून आणण्यात आले आहे. त्यात 100 मिठाच्या गोण्या असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु डीआरआय 24 ते 26 मे दरम्यान केलेल्या तपासणीत 52 किलो कोकेन ड्रग्स सापडले असल्याची माहिती डीआरआयने दिली आहे.
मालवाहू जहाजावरील मिठाच्या पिशव्या तपासत असताना महसूल गुप्तचर विभागाच्या पदाधिकाऱ्यांना काही पिशव्यामध्ये विशेष वास असलेला पदार्थ असल्याचे लक्षात आले.त्यानंतर त्या पदार्थाची तपासणी प्रयोग शाळेत करण्यात आली. तपासणी अहवालात या पदार्थात कोकेनची मात्रा असल्याचे आढळून आल्याने 52 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे.ज्याची किंमत 500 कोटी रुपये आहे. याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे.
देशभरात 2021 - 22 मध्ये महसूल गुप्तचर विभागाने केलेल्या कार्यवाही दरम्यान 321 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते .याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3 हजार 200 कोटी रुपये एवढी होती.याच संदर्भात मागील एक महिन्यात डीआरआयने काही महत्वाचे गुन्हे देखील दाखल केले आहेत.यामध्ये कांडला बंदरावर जीप्सम पॉवडर आयात करत असताना 205 किलो हेरॉईनची तस्करी,पिपावाव बंदरावर 395 किलो हिरोईन,दिल्ली विमान तळाच्या एअर कर्गो कॉम्प्लेक्स मध्ये 62 किलो हेरॉईन , लक्षद्विप बेटाच्या किनाऱ्यावर 218 किलो हेरॉईन जप्त केल्याच्या कारवाईचा समावेश आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon