आमली पदार्थ सेवन व बाळगल्याच्या प्रकारणातून अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानसह 6 जनांना 'एनसीबी'ने सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडले आहे.या प्रकरणात आर्यन खान याने आमली पदार्थ बाळगल्याचा व त्याचे सेवन केल्याचा पुरा नसल्याचे 'एनसीबी'ने स्पष्ट केलं आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे एका खासगी कार्यक्रमासाठी चिंचवड येथे आले होते.त्यांना पत्रकारांनी यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की आर्यन खान याच्यावर जे आरोप करण्यात आले होते त्यामध्ये कुठलेही तथ्य आढळले नसल्यामुळे चार्जशीट मधून आर्यन खान याचे नाव 'एनसीबी'ने वगळले आहे.
याबाबतीत केंद्राने सुद्धा दखल घेतली असून संबंधितावर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ती आमची सुद्धा भूमिका राहील असे वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख यांचा मुलगा आर्यन खान याला मुद्दाम अडकवण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे 'एनसीबी'ने चार्जशीट मधून आर्यन खान याचे नाव वगळल्याने स्पष्ट झाले आहे.
राज्यातील भाजपा आणि टीव्ही चॅनेल्स वाल्यानी या प्रकरणी रान उठवले होते.त्यादरम्यान 24 तास एकच बातमी पहायला मिळत होती ती म्हणजे आर्यन खान याने ड्रग्स बाळगल्याची आणि त्याचे सेवन केल्याचे, अटक केल्याचे,चौकशी चालू असल्याचे गंभीर गुन्हा दाखल झाल्याचे असा एकच विषय देशातील आणि राज्यातील प्रसार माध्यमाकडून चघळल्या जात होता.
आता 'एनसीबी'ने आर्यन खान याला निर्दोष सोडले आहे.तर मग आता ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कार्यवाही करत एखाद्या निष्पाप व्यक्तीची बदनामी केल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी टीव्ही मीडिया लावून धरणार का? की फक्त एखाद्या विशिष्ट समाज घटकाला बदनाम करण्यासाठी टीव्ही चॅनेल्स वाल्यानी पुढाकार घेतला होता. हे येत्या काळात दिसून येईलंच यात मात्र शंका नाही.
संपादकीय...
ConversionConversion EmoticonEmoticon