मुंबई : महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची पोलिसांना काढली धिंड

नालासोपारा परिसरात महिलेवर बलात्कार करणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडाला तुळींज पोलिसांनी पकडून त्याची धिंड काढली 
मुंबई - नालासोपारा :पतीला डांबून ठेऊन महिलेवर बलात्कार करणाऱ्या गुंडाची शुक्रवारी पोलिसांनी काढली धिंड. मोनू रायडर नावाच्या गुंडाने महिलेच्या पतीला डांबून ठेवत त्या महिलेवर बलात्कार केला.पोलिसात अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या या मोनू रायडर नावाच्या गावगुंडाला अद्दल घडावी व लोकांमध्ये असलेली त्याची दहशत नाहीशी व्हावी या करिता तुळींज पोलिसांनी हातात बेड्या घालून साखळीने बांधून 2 तास त्याची परिसरात धिंड काढली.या गुंडाची धिंड काढून  इतर गुंडाना सुद्धा हा ईशाराच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

निशांत उर्फ मोनू रायडर मनोज कुमार मिश्रा वय 33 या आरोपीने बळजबरीने महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला व तिला मारहाण केली. मोनू रायडर या आरोपीच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला बळजबरी दुचाकीवर बसवून अज्ञात स्थळी घेऊन जाऊन तिथे 2 तास डांबून ठेवले. या दरम्यान मोनू रायडर याने महिलेला मारहाण करून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. महिलेच्या अंगावर या आरोपीने मारहाण करून जखमा देखील केल्या होत्या.एवढेच नव्हे तर पीडित महिलेच्या घरातील पैसे देखील जबरदस्तीने नेले.

या प्रकरणी पीडित महिलेने ताबडतोब तिळुंज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून आरोपी मोनू रायडर याच्या विरोधात मारहाण, दरोडा व बलात्कार अशा प्रकारे गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर मारहाण, खून आणि लूटमारीचे यापूर्वी 16 गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात या गावगुंडाची दहशत होती. लोकांमध्ये मोनू रायडर याची असलेली दहशत घालवण्यासाठी तिळुंज पोलिसांनी या गावगुंडाची पोलीस ठाणे पासून हातात हातकडी व साखळीने बांधून परिसरात पायी 2 तास चालवत धिंड काढून फिरवले. 
Previous
Next Post »