भाजपाने शिवसेना फोडण्यासाठीच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं!

शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले 
भाजपाने शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून कारभार करण्याचे सांगितले आहे. शिवसेनेच्या फुटीरतावादी गटाला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपा सहजासहजी कशी तयार झाली. भाजपा एवढी उदारमतवादी कशी काय झाली. हे राज्यातील जनतेला नक्कीच माहिती आहे. याच एकच उत्तर आहे शिवसेना संपविण्यासाठी केलेला प्लॅन आहे.

जर हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा मनमोकळे पणा भाजपाने दाखवला असे जर वाटत असेल तर हिंदुत्वाच्या मुद्यावर 25 वर्ष शिवसेना- भाजप युती असताना 2019 ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत एवढा मनमोकळे पणा भाजपाने का दाखवला नाही? जर तेंव्हाच मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे दिले असते तर अडीच वर्षे सत्तेबाहेर राहण्याची वेळ भाजपा आली नसती.

 परंतु शिवसेनेला मोठं होऊ द्यायचं नाही या राजकीय उद्देशानेच भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला आणि त्यानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण बनले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. ज्या बंडखोर नेत्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून वेगळा गट स्थापना केला त्यांनी सुद्धा अडीच वर्षे मंत्रीपदाची व सत्तेची मुक्ताफाळे चाखली आहेत.मग अचानक हिंदुत्वाचा पुळका कसा आला.

 तर यामध्ये अनेकांना ईडीच्या चौकशीची भीती आणि त्या ससेमिऱ्यातून सुटका करून घायची होती.यासाठी शिवसेनेचे मंत्री आमदार फितूर झाले आणि त्यासाठी भाजपाने सर्वोतपरी शिवसेनेच्या फुटीरतावादी गटाला मदत केली. ती केवळ शिवसेना फोडण्यासाठी आणि शिवसेना संपविण्यासाठी भाजपाने डाव खेळला आहे.
                            
                                           संपादकीय....
Previous
Next Post »