कर्नाटकात हिजाब विरुद्ध भगवा वाद पेटला, विद्यार्थ्यांनी चक्क राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी चढवला भगवा झंडा
कर्नाटक : कर्नाटकात हिजाब विरुद्ध भगवा वाद पेटला असल्याचे काल आपण वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. शिमोगातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चक्क राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा झंडा चढवल्याचे सर्वांनी पाहिलं आहे. विद्यार्थ्यांचे हे कोणते राष्ट्र प्रेम आहे. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आयुष्यातील ध्येय प्राप्त करण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. परंतु इथे धर्माच्या नावाखाली राष्ट्र ध्वजालाही किंमत उरली नाही. अशा प्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्र ध्वजाचा अपमान करून धर्माला महत्व देत असतील तर ते राष्ट्रीय एकात्मतेला घातक आणि राष्ट्रहिताला बाधा निर्माण करणारे असतील.कर्नाटकामधील एका महाविद्यालयाने मुस्लीम मुलींना हिजाब घातल्याने प्रवेश नाकारला होता. त्याविरोधात त्या मुलीने सर्वोच्च न्यायालयात दाद माघितली आहे. त्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी होणार आहे. परंतु काल एक मुलगी हिजाब घालून महाविद्यालयात आल्याने हिंदू विद्यार्थ्यांनी भगवे रुमाल घालून त्या मुलीला आढवून हुलडबाजी करत वाद घातला आणि जयश्रीरामच्या घोषणा दिल्या.हे विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क राष्ट्र ध्वजाच्या ठिकाणी भगवा झंडा चढवला.राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या प्रकरणी कर्नाटक सरकार या विद्यार्थ्यांवर कोणती कार्यवाही करणार आहे की नाही हेही बघावे लागेल.
हिजाब विरुद्धचा वाद हा मुळात महाविद्यालय प्रशासनासंबंधित होता यात विद्यार्थांनी उडिघेण्याचा काहीही संबंध नव्हता. महाविद्यालय, राज्यसरकार आणि न्यायालय त्या बाबतीत काय निर्णय द्यायचा ते देईल. भारतीय संविधानाने देशातील नागरिकांना धार्मिक तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोणी कोणते कपडे घालावे कोणी काय खावे कसे रहावे कोठे रहावे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
प्रश्न जर शालेय गणवेशचा असेल आणि तो शाळा किंवा महाविद्यालयाचा निर्णय आहे असं जरी आपण मानलं आणि त्यामुळे हिजाब घालण्यावर बंदी केली असेल तर शीख धर्मीय विद्यार्थांना दाढी आणि पगडी ठेवण्यापासून रोखणार का? हिंदू मुलं कपाळावर लाल किंवा भगवा टिळा लावून येतात त्यांना तस करण्यापासून रोखणार का? किंवा आंबेडकरवादी विद्यार्थी निळा टिळा लावून आल्यास त्यांना रोखणार का? तर असं होणार नाही.
मग अशा निरर्थक गोष्टीवरून विद्यार्थ्यांनी धार्मिक वाद का निर्माण करावा. हिजाब घालणे किंवा न घालणे हा अभ्यासक्रमचा भाग नाही. परंतु अशा प्रकाराने धार्मिकवाद आणि जातीय वाद अधिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.मागील अनेक महिन्यापासून कोरोना मुळे शाळा कॉलेज बंद आहेत अभ्यासक्रम व्यवस्थित विद्यार्थितांना पूर्ण करता येतनाही अशा परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांनी हिजाब विरुद्ध केलेल्या वादामुळे आणखीन वाद चिघळू नये म्हणून कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे मात्र नक्की.
ConversionConversion EmoticonEmoticon