ठाणे : राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात 'उत्तर सभा' झाली. त्यासभेत राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जितीवरील भोंगे 3 मे पर्यंत काढून टाकण्याचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला.3 मे पर्यंत मस्जितीवरील भोंगे काढून टाकले नाही तर राज्यात आणि देशात सर्वत्र मस्जितीसमोर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात म्हटली जाईल असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
या आधी 3 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याचे सरकारला सांगितले होते. त्यानंतर राज्यात राजकीय नेत्यांच्या आणि नागरिकांच्या वेगवेल्या प्रतिक्रिया पहायला मिळाल्या.महाविकास आधाडी सरकार मधील नेत्यांच्या प्रतिक्रियांना प्रतिउत्तर देण्यासाठी मंगलवार 12 एप्रिल रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नकला करून त्यांना प्रतिउत्तर दिले आणि 3 मे पर्यन्त मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याचा राज्य सरकारकारला अल्टीमेटम दिला आहे.
राज्यातील बेरोजगारी आणि महागाईची समस्या संपली काय?
राज ठाकरे यांनी मंगळवारी 12 एप्रिल ठाण्यातील जाहीर सभेत आणि 3 एप्रिल रोजी शिवाजी पार्क वरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात राज्यातील पेट्रोल -डिझेल, गॅस व खाद्य तेल या जीवनावशक वस्तूंच्या भरमसाठ झालेल्या दरवाढी बाबत आणि वाढत्या बेरोजगारी बाबत कुठलेही भाष्य केलं नाही. केवळ मस्जिवरील भोंग्यांचा नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे भोंगे काढून टाकण्यासाठी राज्य सरकारला सांगतात.
मस्जितीवरील भोंगे काढून टाकल्याने राज्यातील आणि देशातील आकाशाला भिडणारी महागाई आणि दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी कमी होणार आहे का? मुळात मस्जितीवरील भोंगे ही या राज्यातील लोकांची समस्याच नाही. केवळ राजकीय पोळीभाजण्यासाठी दोन धर्मामध्ये धार्मिक तेढनिर्माण करून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. युवकांची माथी भडकावून राज्यातील कायदा सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना दिसत आहे.एवढे मात्र नक्की...
संपादकीय....
ConversionConversion EmoticonEmoticon