भारतीय जवानांने पाकचे नापाक मन्सूबे केले उद्धवस्त, 7 मॅग्नेटिक बॉम्ब व 7 यूजीबीएल ग्रेनेड घेऊन येणारे ड्रोन गोळीबार करून खाली पाडले
जम्मू : जम्मू - काश्मीरच्या काठूआ जिल्ह्यात रविवारी अंतरराष्ट्री सीमा पार करून भारतीय हद्दीत प्रवेश केलेल्या एका पाकिस्तानी ड्रोनला काही वेळातच भारतीय जवानांनी गोळीबार करून खाली पाडले.या ड्रोनवर 7 चुंबकीय बॉम्ब (magnetic bomb ) व 7 युबीजीएल ग्रेनेड आढळून आले आहेत.ही घटना अंबरनाथ यात्रा सुरु होण्यापूर्वी दक्षिण काश्मिरात घडली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले आहे.जम्मू काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना राजबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तल्ली हरिया चक्क गावच्या सीमेवर एक ड्रोन दिसले. त्यानंतर जवानांनी ताबडतोब गोळीबार करून ते खाली पाडले. खाली पाडलेल्या ड्रोनची पाहाणी केली असता त्यावर 7 चुंबकी बॉम्ब व 7 अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर (यूबीजीएल ) सापडले आहेत.ड्रोनला चीनी बॅटरी लावल्याचे आढळून आले आहे. दहशतवाद्यांनी मोठा कट रचला असल्याचा पोलिसांना दाट संशय असल्याचे सांगितले आहे.
30 जून पासून या भागात 43 दिवस दोन मार्गाने अंबरनाथ यात्रा सुरु होणार आहे. अंबरनाथ यात्रेत पाकिस्तानकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच हा एक प्रयत्न पाकिस्तानने केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon