मराठवाडा व विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अनुमान
मुंबई : राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मेघ गर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह मुसळ धार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागे सांगितले आहे. उत्तरेकडील पश्चिमी चक्रवात आणि अरबी समुद्रातून येणारी अर्द्रता आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागारातून एकत्रित येणार वारे यामुळे प्रभाव निर्माण होऊन 10 ते 13 जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम व मध्य भारतात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून 10 जानेवारी रोजी मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह मुसळ धार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.राज्यातील हवामानात अमूलाअग्र बदल झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण कायम राहणार असल्याने त्याचा परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भात विजेच्या कडकटासह गारा, वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस कोसणार आहे.विदर्भातील चंद्रपूर, भंडारा,गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सोमवारी 'येलो ' अलर्ट जारी केला आहे. याच बरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon