पिंपरी चिंचवड : शस्त्रविरोधी पथकाची धाडसी कार्यवाही ; गावठी पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार ताब्यात

शस्त्र विरोधी पथकाने गावठी कट्टा सह आरोपीला घेतलं ताब्यात 
पुणे : पिंपरी चिंचवड आयुक्तलयच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगणारा आरोपी ताब्यात. याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.25 ऑगस्ट रोजी पो कॉ प्रितम वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, सराईत गुन्हेगार मोन्या उर्फ ऋषिकेश शामराव वाघेरे वय 23 रा. कस्पटे वस्ती, वाकड येथे वास्तव्यास असलेल्याची माहिती मिळाली होती.

आरोपी बद्दल माहिती मिळताच शस्त्रविरोधी पथकातील पो उपनिरीक्षक दळवी, सहा. फौजदार शिंदे, सहा. फौजदार लखनकुमार वाव्हळे, पो हवा. प्रितम वाघ, पो हवा. नामदेव वडेकर,पो हवा. वशिम शेख, पो अंमलदार मोसीन आत्तार व सागर शेळके यांनी सापळा रचून आरोपी मोन्या उर्फ ऋषिकेश शामराव वाघेरे याच्या राहत्या घरी छापा टाकला असता, आरोपी घरातील कॉटवर बसलेला असताना त्याच्या पाया जवळ गावठी कट्टा आढळून आला.

आरोपीला ताब्यात घेऊन गावठी कट्टा जप्त करण्यात आला व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.आरोपी विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) तसेच 37(1)(3)सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पो उपनिरीक्षक भरत गोसावी शस्त्र विरोधी पथक पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी दिली आहे.

Previous
Next Post »