जानेवारी महिना अखेरीस कोरोना गाठणार उच्चांक ; गृहविलगीकरण किट करणार तयार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

जानेवारी अखेरीस कोरोना गाठणार उच्चांक, तिसऱ्या लाटेचा परिणाम, गृहविलगीकरण किट तयार करणार - राजेश टोपे 
जालना : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे रुग्ण संख्येचा दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जानेवारी महिन्यात कोरोना फैलाव मोठ्याप्रमाणात असून महिन्याअखेरीस याचे प्रमाण कमी होईल असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या सोबत कोरोना परिस्थिती विषयी बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ते मध्यमांशी बोलत होते.
सध्या राज्यात आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नाही.जिल्हा पातळीवर गृह विलगीकरण किट तयार करण्यात येणार आहे.याच सोबत कोरोना तपासणी चाचण्यांची संख्या देखील वाढणार असल्याबाबत ची माहिती राजेश टोपे यांनी दिली.जानेवारी महिना अखेरीस कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक झाला आहे मात्र रुग्णांचा मृत्यू दर खूप कमी आहे. त्याचसाठी लसीकरण मोहिमेची गती आणखी वाढविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जवळपास 90 टक्के लोकांनी आता पर्यंत लसीची पहिली मात्र घेतली आहे तर,69 टक्के लोकांनी लसीची दोन्ही मात्रा घेतल्या आहेत .

व्हिलगीकरणाचा कालावधी देशात 7 दिवसाचा करण्यात आला आहे. त्यात कुठलाही बदल होणार नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
Previous
Next Post »