वाळू माफीयांवर सिंघम स्टाईल कारवाई, 22 हायवा, 5 टिप्पर, 3 ट्रक, 5 जेसीबी सह 7 कोटी 39 लाख,40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, 98 जनाविरुद्ध गुन्हा दाखल,38 जनांना अटक
परभणी : गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेनिक लोढा यांची वाळू माफियावर धाडसी कार्यवाही.दोन दिवसात ही दुसरी धाडसी कार्यवाही असून पूर्णा तालुक्यातील वझुर येथे गोदावरीच्या पात्रातून अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्या 22 हायवा,5 टिप्पर, 3 ट्रक,5 जेसीबी आणि एक कार 8 मोटर सायकल व एक बोट जप्त करत वाळू माफियांना चांगलाच धक्का दिला आहे. यामुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दानानले आहेत.
महसूलविभागाने या अवैध वाळू उपसा प्रकरणी कार्यवाही करायला पाहिजे होती.मात्र याबाबत महसूल प्रशासन मुगगिळून गप्प आहे.त्यामुळे वाळू माफियावर पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र कार्यवाही करण्यात येत आहे. पोलीस उपाधीक्षक तथा गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेनिक लोढा यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझुर येथे गोदावरी पात्रात अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्यावर ही कार्यवाही केली आहे.या प्रकरणी 98 लोकांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 35 जनांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात वाळू माफीयांनी हैदोस माजवला असून बेसुमार अवैध वाळू उपसा केला जात आहे.10 मे रोजी सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यात वाळू माफीयांवर अशीच धाडसी कार्यवाही करत 12 हायवा,4 पोकलेन व 2 बोटी जप्त करत 35 आरोपीविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कार्यवाहीत 94 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.त्यानंतर लगेच 2 दिवसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेनिक लोढा यांनी ही दुसरी मोठी कार्यवाही केली आहे.
पूर्णा तालुक्यात वझुर याठिकाणी गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती श्रेनिक लोढा यांना मिळताच त्यांनी पथक सोबत घेऊन गुरुवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास धाड टाकून 22 हायवा, 5 टिप्पर, 3 ट्रक, 5 जेसीबी,एक कार, वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी एक लोखंडी बोट आणि 8 मोटरसायकल असा एकूण 7 कोटी 39 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 98 आरोपिंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 38 जनांना अटक करण्यात आली आहे.तर 60 जन फरार झाले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon