BJP MLA Jaykumar Gore : भाजपा आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा दणका ; जमीन अर्ज फेटाळला

BJP आमदार जयकुमार गोरेंना मुंबई हाय कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला, 2 आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा 
मुंबई : भाजपाचे माण - खटाव मतदार संघाचे विद्यमान आमदार व बीजेपी सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांचा जामीन अर्ज मंगळवार 14 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.पुढील दोन आठवड्यात जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली असली तरी त्यांच्या अडचणीत मात्र वाढ होताना दिसत आहे.यापूर्वी न्यायालयाने आमदार विजयकुमार गोरे यांना तात्पुरते संरक्षण देत त्यांना अटक ना करण्याचे सातारा पोलिसांना आदेश दिले होते.

या प्रकरणी 9 जून रोजी पुन्हा सुनावणी सुरु झाली होती.या प्रकरणी आज अर्जावर सुनावणी आदेश देण्यात आला असून जयकुमार गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात रेवती-ढेरे यांच्या कोर्टात सुनावणी झाली होती. त्याचा आदेश आज सकाळी उच्च न्यायालयाने दिला आहे.या प्रकरणी ऍड मनोज मोहिते, ऍड. वैभव आर गायकवाड व ऍड डी एस माळी यांनी फिर्यादीची बाजू मांडली. 20 जून रोजी विधानपरिषदेची मतदान प्रक्रिय पारपाडली जाणार आहे.त्यामुळे निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आमदार गोरे यांना मुदत मिळाली असली तरी त्यांना पुढील दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज करावा लागेल.

जयकुमार गोरे यांचा अटक पूर्व जामीन वडूज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्या नंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोरे यांनी एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी जयकुमार गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.त्याप्रकारणात गोरे यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी काही दिवसापूर्वी न्यायमूर्ती नितीन सांब्रे व न्यामूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खांडपिठासमोर सुनावणी झाली होती.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
या प्रकरणात मायणी गावातील एका जमिनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी भाजपा आमदार जयकुमार गोरे,दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे,महेश पोपट बोराटे यांच्या सह सहा जनांचा समावेश असून त्यात एका टाळठ्याचाही समावेश आहे.सद्या तलाठी मात्र फरार आहे.या प्रकरणी महादेव पिराजी भिसे यांनी फौजदारी तक्रार दिली आहे.

Previous
Next Post »